टीईटी प्रमाणपत्र खरे की खोटे ; 'हे' शिक्षक होणार 'शाळाबाह्य', पगार थांबविणार

शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी आता करण्यात येत आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्राच्या माध्यमातून नोकरी मिळवल्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे.
MAHA TET Exam
MAHA TET Examsarkarnama
Published on
Updated on

पुणे : टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) गैरप्रकार उघडकीस आल्याने शिक्षणक्षेत्रात खळबड उडाली आहे. बनावट प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविणाऱ्या शिक्षकांचा आता शोध घेतला जात आहे. राज्यात 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या टीईटी (MAHA TET Exam) प्रमाणपत्रांची गुणपत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत नोकरी मिळविलेल्या शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे.

शिक्षण परिषदेने याबाबतचे आदेश जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे लवकर 'हे' शिक्षक 'शाळाबाह्य' होणार आहेत. टीईटी परीक्षेत (TET exam) गैरव्यवहार उघडकीस आल्याने राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. २०१८-२०२० दरम्यान नियुक्त झालेल्या शिक्षक भरतीतील काही नावे उघड झाली असून पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.

TET परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची माहिती पुढे आली होती. तसेच हा गैरव्यवहार उघड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पडताळणीतून बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवलेल्या शिक्षकांचा शोध लागण्याची शक्यता आहे. सध्या सहाशे प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी आता करण्यात येईल. त्यामुळे बोगस प्रमाणपत्राच्या माध्यमातून नोकरी मिळवल्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे.

सध्या सहाशे प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी आता करण्यात येत आहेत. त्यामुळे बोगस प्रमाणपत्राच्या माध्यमातून नोकरी मिळवल्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. प्रमाणपत्र पडताळणीसाठी विभागांनी २०९ शिक्षकांची प्रमाणपत्रे परीक्षा परिषदेकडे सुपूर्त केली आहेत. परीक्षा परिषदेचा मुळ प्रमाणपत्र पाठविणे बंधनकारक आहे, अन्यथा पगार मिळणार नाही, असे परिषदेचे कळविले आहे. जे शिक्षक आपले मूळ प्रमाणपत्र पाठविणार नाही, त्यांचा पगार थांबविण्यात येणार आहे.

MAHA TET Exam
लतादीदींना न्युमोनियाचीही लागण ; 'ब्रीच कॅंडी'त उपचार, 'लवकर बरे व्हा' वाळूशिल्पातून प्रार्थना

पुणे सायबर पोलिसांच्या चौकशीत आरोग्य भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर तपास सुरु केला होता. त्या दरम्यान त्यांना म्हाडा परीक्षेचा पेपर फोडला जाणार असल्याची लिंक लागली. याचा तपास करताना महाटीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचं समोर आलं. पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांच्यासह काही जणांना अटक केली आहे. तुकाराम सुपेच्या घरावर आणि त्याच्या मेव्हण्याच्या घरावर छापा टाकला. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरातून कोट्यवधी रुपये अन् सोनंही सापडलं आहे. पुणे पोलिसांनी सोनं देखील जप्त केलं आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अद्याप तपास सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com