Vidhansabha Poll : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र, आत्ता निवडणूक झाली तर निकाल काय असतील? याचे विविध सर्व्हे समोर येत आहेत. बहुतांश सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी सत्तेत येत असल्याचे चित्र आहे.
'साम टिव्हीने' सर्व सर्व्हेंचा आधार घेत पोल ऑफ पोल केला. या पोलचे आकड्यांना महायुतीसोबत महाविकास आघाडीचे टेन्शने वाढवणारे आहेत.
साम टिव्हीच्या पोल ऑफ पोलनुसार महाविकास आघाडी सत्तेच्या जवळ जात आहे. मात्र, त्यांना स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची मदत घेण्याची वेळ महाविकास आघाडीवर येऊ शकते, असा अंदाज या पोल ऑफ पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
साम टिव्हीच्या पोल ऑफ पोलनुसार महायुतीला 135 तर महाविकास आघाडीला 143 तर अपक्ष आणि इतर पक्षांना 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बहुमताचा 147 चा आकडा हा मविआ आणि महायुती गाठताना दिसून येत नाही. मविआ सत्तेच्या जवळ असून त्यांना अपक्षांची मदत घ्यावी लागेल, असा अंदाज पोल ऑफ पोलनुसार वर्तवण्यात आला आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रमुख सहा पक्ष मैदानात असणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्याने या दोन पक्षांचे चार पक्ष झाले आहेत. तर, काँग्रेस आणि भाजप हे देखील मैदानात असणार आहेत. त्यामुळे महायुतीत भाजप, शिंदे गट, अजित पवार गट आणि मविआमध्ये काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट असणार आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होणार असली तरी तिसरी आघाडी, वंचित बहुजन पक्ष तसेच छोटे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. महायुती किंवा मविआकडून तिकीट न मिळाल्याने बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या लढतीचा फायदा कोणाला होणार याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे राजकीय विश्लेषक म्हणत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.