Indrayani River Bridge Collapsed Update : कुंडमळा पूल दुर्घटना चार जणांचा मृत्यू

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Indrayani River Bridge Collapsed Update : कुंडमळा पूल दुर्घटना चार जणांचा मृत्यू
Published on
Updated on

कुंडमळा पूल दुर्घटना, मृतांचा कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

:कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे. चार जणांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झाला आहे. दरम्यान, 40 जण वाहून गेले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कुंडमळा पूल दुर्घटना, अमित शाहांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन

इंद्रायणी नदीवरील तळेगाव, पुणे येथील पूल दुर्घटनेच्या दुर्दैवी घटनेमुळे मन सुन्न झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आणि घटनास्थळावरील सद्यस्थितीची माहिती घेतली, अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या ट्विटवरद्वारे दिली. दुर्घटनेनंतर NDRF टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, बचावकार्य सुरू केले आणि अनेकांचे प्राण वाचवले. या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांचा जीव गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो, असे देखील शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कुंडमळा पूल दुर्घटना, गिरीश महाजन घटनास्थळी दाखल

कुंडमळा पूल दुर्घटनंतर घटनास्थळी मदत आणि पूर्नवसन मंत्री गिरीश महाजन दाखल झाले. क्षमतेपेक्षा अधिक पर्यटक पूलावर उभे होते त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे महजान यांनी म्हटले. तसेच एनडीआरएफीद्वारे बचाव कार्य सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

कुंडमळा पूल दुर्घटना, तब्बल 40 पर्यटक वाहून गेले, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

एनडीआरएफकडून बचाव कार्यसुरू असून कुंडमळा पूल दुर्घटना तब्बल 40 पर्यटक वाहून गेले आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील एनडीआरएफकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कुंडमळा पूल दुर्घटनेतील आकडेवारी समोर,दोन जणांचा मृत्यू, सहा जण गंभीर तर 32 जण...

कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. आत्तापर्यंत 6 जणांना वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन जणांना मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Ajit Pawar ON Bridge Collapsed : कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Indrayani River Bridge Collapsed : पूल कोसळून पर्यटक आडकले, बचावकार्य सुरू

इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पुल कोसळून 20 पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे. दरम्यान, दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. एनडीआरफचे पथक घटनास्थळी असून पूल कोसळून आडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याच्या रेस्क्यु ऑपरेशन सुरु अद्यापही सुरू आहे. हा पूल दुपारी साडेतीनच्या सुमारास कोसळला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com