Video Mahavikas Aghadi : मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला ठरला? विधानसभेत...

Chief Minister Candidate Shiv Sena NCP Congress : राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत जावून वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीत महाविकास आघाडीतूनच आगामी लोकसभा निवडणूक लढण्याच्या सूचना राज्यातील नेत्यांना करण्यात आल्याची माहिती आहे.
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Sarkarnama

Mahavikas Aghadi News : लोकसभा निवडणुक मोठे यश मिळवणारी महाविकास आघाडी विधानसभेतही एकत्र लढणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा चेहरा कोण असणार याची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

'साम' टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढणार आहे. आत्ता मुख्यमंत्री पदाचा कोणताही चेहरा पुढे न करता निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल, असे 'साम'ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

काँग्रेस Congress आणि ठाकरे गटात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेचे होण्याची शक्यता होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) तीनही पक्षांना चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Mahavikas Aghadi
PM Modi: कोण राहुल गांधी? म्हणणाऱ्या मोदींना आता राहुल यांना रामराम करावं लागलं...

राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीत महाविकास आघाडीतूनच MVA आगामी लोकसभा निवडणूक लढण्याच्या सूचना राज्यातील नेत्यांना करण्यात आल्याची माहिती आहे. विधानसभा जागा वाटपात जास्तीत जास्त जागा मिळवण्याचे प्रयत्न काँग्रेसचे असणार आहेत.

जागा वाटपाचे सुत्र काय?

महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सुत्र अजून निश्चित झालेले नाही. मात्र, 96-96-96 चा फाॅर्म्युला सध्या चर्चेत आहेत. मात्र, ठाकरे गट तसेच काँग्रेस नेत्यांचा 100 पेक्षा अधिक जागा लढण्याचा आग्रह आहे. तर, राष्ट्रवादी (शरद पवार गट) देखील लोकसभेत आम्ही कमी जागांवर लढलो मात्र विधानसभेत तसे होणार नाही. आमचा जास्त जागांसाठीचा आग्रह असणार असल्याचे सांगितले आहे.

Mahavikas Aghadi
Lok Sabha Deputy Speaker : लोकसभा उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार! काँग्रेस सत्तेत असताना काय होती परिस्थिती?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com