Maharashtra Politics News : महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपपाल्या मुख्यमंत्रीपदाची चाचपणी करताना दिसतात. महाराष्ट्रात किती जागा लढायच्या आणि किती जिंकायच्या याचा अंदाज घेत आहेत. या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची एकच महत्त्वाकांक्षा आहे, ती म्हणजे मुख्यमंत्रीपदाला गवसणी घालण्याची. यात मात्र अजित पवारांची धडपड, जरा जास्तच दिसते.
महायुतीत 80 पेक्षा अधिक जागा लढवून, त्यात सर्वाधिक जागा जिंकून आणून मुख्यमंत्रीपदावर दावा करायची तयारी अजित पवारांची दिसते. परंतु कमी आल्या तरी अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत राहतील, असे काहीसे राजकीय चित्र आजमितीस दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महायुतीत वाढते वर्चस्व अजितदादा आणि देवा भाऊ यांच्या महत्त्वाकांक्षेला अडथळा ठरू पाहत आहे. त्यामुळे महायुतीमधील एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात छुपा राजकीय संघर्ष अलीकडच्या काळात तीव्र झाल्याचे दिसते.
राज्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसारात गुंतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघंही या योजनेच्या प्रचारात आहेत. संपूर्ण राज्यभरात इव्हेंट घेतले जात आहे. परंतु अजित पवार यांनी समांतर कार्यक्रम आखून जनसन्मान रॅली सुरू केली आहे. यात देखील लाडकी बहीण योजनेवर आणि राज्यात करत असलेल्या कार्यक्रमावर अजित पवार (Ajit Pawar) थेट संवाद साधत आहेत.
अजितदादांना आगामी काळात 'किंगमेकर'च्या भूमिकेत राहायचे आहे. त्यासाठी ही रॅलीतून विधानसभा निवडणुकीपूर्वी अजितदादा राज्यातील एक ताकदवान राजकीय नेता म्हणून उदय करू पाहात आहेत. अजितदादांची ही महत्त्वाकांक्षा भाजप आणि शिवसेनेपासून लपून राहिलेली नाही. त्यामुळे महायुतीमध्ये सध्या दोन संघर्ष दिसत आहेत. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सुरू असलेला संघर्ष आणि एकनाथ शिंदे-अजित पवार यांच्यामध्ये सुरू असलेला संघर्ष!
महायुतीची सत्ता आल्यास एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असू शकतात, त्यांचे दिल्लीत वाढलेले वजनाबरोबर नरेंद्र मोदी आणि अमित शहांची प्रिय जवळीक सध्या चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद दिसली. तिच विधानसभेत दिसेल, असा अंदाज आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी पक्षसंघटनेत काम करण्यास सुरवात केली आहे. या निवडणुकीत शिंदे यांच्या चांगल्या जागा निवडून आल्यास मुख्यमंत्रीपदाचे पुन्हा दावेदार ठरण्याची शक्यता आहे. मात्र अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नपूर्तीला एकनाथ शिंदे अडसर ठरू शकतात.
अजित पवार यांची सध्याची धडपड पाहता, त्यांनी मुख्यमंत्रीपदावर लक्ष्य ठेवले आहे. महायुतीकडून विधानसभा निवडणुकीला सर्वाधिक 80 पेक्षा जास्त पदरात पाडून सर्वाधिक जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. पण अजित पवार यांच्या वाट्याला किती जागा येतात, याकडे आता लक्ष आहे. भाजपने विद्यमान आमदार आणि वाढीव जागांची मागणी विचारात घेतल्यास 160 पेक्षा जास्त जागांवर भाजप दावा करत आहेत. शिवसेना 100 ते 120 जागांवर दावा करत आहेत. उर्वरीत जागांचा हिशोब केल्यास अजित पवाराना खूपच कमी जागा मिळतात. अजित पवार यांच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील, त्यानुसार ते लढल्यास आणि त्यात 25 जागांवर विजय मिळवल्यास निवडणुकीनंतर अजित पवार कोणता निर्णय घेतात, हे देखील महत्त्वाचे राहणार आहे. यामुळे महायुतीमध्ये राजकीय डावपेच वाढणार, असे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.