Eknath Shinde : लाडके मुख्यमंत्री शिंदेंना मोठा झटका, पदाधिकाऱ्यांनी घेतलाय सामूहिक निर्णय

Shiv Sena Eknath Shinde group Muslim office bearers resign : मुस्लिमांच्या भावना दुखवल्या जातील, असे विधान करणाऱ्या रामगिरी महाराजांना समर्थन देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा.
Eknath Shinde1
Eknath Shinde1Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : लाडकी बहिणींच्या कार्यक्रमांमध्ये गुंतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसला आहे. उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना सामूहिक राजीनामे दिलेत. 'यह अच्छा नही हुआ शिंदेसाहब', असे म्हणत या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत.

रामगिरी महाराजांनी मुस्लिमांच्या भावना दुखवणाऱ्या विधानाचे समर्थन करणे शिवसेनेचे (Shiv Sena) प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या पक्षसंघटनेला आता जड जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनेचे सामूहिक राजीनामा दिले असून, तसे राजीनामा पत्र पक्षाचे सचिवांकडे धाडून दिलेत. भविष्यात शिवसेना पक्ष संघटनेत मुस्लिम कार्यकर्त्यांचा राजीनाम्याचा वेग वाढेल, असा देखील इशारा देण्यात आला आहे.

Eknath Shinde1
Ramgiri Maharaj : रामगिरी महाराज विधानावर ठाम; म्हणाले, 'आदर्श चांगले नसतील, तर समाज रसातळाला...'

मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या एका समाजाचा अपमान होत आहे, आणि मुख्यमंत्री (Eknath Shinde) त्याचे समर्थन करत आहे, हे योग्य वाटत नाही, असे म्हणत शिवसेनेचे अल्पसंख्याक उत्तर महाराष्ट्र राज्य समन्वयक अंजर खान यांनी राजीनामा दिला. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आणि पदाचा राजीनामा दिला. याशिवाय जिल्हाप्रमुख मुस्तफा शेख, जिल्हा उपप्रमुख सरफराज पठाण, उपशहर प्रमुख राजू जहागिरदार, उपशहर प्रमुख शाहरुख कुरेशी यांच्यासह अल्पसंख्याक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा पत्र शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे पाठवून दिला.

Eknath Shinde1
Chhagan Bhujbal : "मी स्वतः त्यांच्या कार्यक्रमाला जातो, पण..."; रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मुख्यमंत्र्यांकडून अप्रत्यक्ष समर्थन

रामगिरी महाराज यांनी ज्यांच्याविषयी विधान केले आहे, त्यांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला आहे. मुस्लिम आजही त्यांनी दिलेल्या शांततेच्या मार्गावर चालतो. परंतु रामगिरी महाराज यांनी त्यांच्या अपमान करत मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आहेत. मुख्यमंत्री समोर हा प्रकार झाला. यानंतर मुस्लिमांच्या भावनांचा उद्रेक झाला. मुस्लिम समाज रस्त्यावर उतरून सरकार आणि प्रशासनाचे शांततेच्या मार्गाने लक्ष वेधत आहे, तरी रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई होत नाही. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांचे अप्रत्यक्षपणे समर्थन करत आहेत.

काय म्हणालेत मुख्यमंत्री

"देशाला संतांची परंपरा लाभली आहे. संतांच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची ताकद नाही", असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांचे एकप्रकारे समर्थन केले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील मुस्लिम समाजात तीव्र पडसाद उमटत आहेत. तसंच शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पक्ष संघटनेत काम करणारे मुस्लिम पदाधिकारी देखील नाराज आहेत. उत्तर महाराष्ट्रातून मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या समर्थनाचा राजीनामा देत विरोध करण्यास सुरवात केली आहे.

रामगिरी महाराज अनिष्ट प्रथांवर बोलले

रामगिरी महाराजांचे विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका अस्पष्ट असल्याने शिवसेना पक्ष संघटनेपासून आगामी काळात मुस्लिम समाज वेगाने लांब जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसंच पक्ष संघटनेत काम करत असलेले मुस्लिम कितपत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहतील यावर देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, रामगिरी महाराज यांनी समाजातील अनिष्ट प्रथांवर बोललो आहे, अशी भूमिका घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com