Assembly Election 2024 : शिंदे सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर? 'या' महिन्यात होण्याची शक्यता...

Assembly Election 2024 : विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी विधानसभा अस्तित्वात न आल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.
Devendra Fadnavis | Ajit Pawar |  Eknath Shinde | Sharad Pawar|  Uddhav thackeray | Nana Patole
Devendra Fadnavis | Ajit Pawar | Eknath Shinde | Sharad Pawar| Uddhav thackeray | Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू-काश्मीर आणि हरयाणा या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा शुक्रवारी केली. गेल्या तीन निवडणुकांत हरयाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा एकाच वेळी झाली होती.

पण, महाराष्ट्राची निवडणूक दिवाळीनंतर होण्याचे संकेत निवडणूक आयोगानं दिले आहेत. तरी, ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यावर, अर्थात डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे सरकारच्या ( Shinde Govt ) 'लाडकी बहीण' योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी विधानसभा अस्तित्वात न आल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

Devendra Fadnavis | Ajit Pawar |  Eknath Shinde | Sharad Pawar|  Uddhav thackeray | Nana Patole
Assembly Election Surve : राज्यातील पक्षांचे वेगवेगळे सर्व्हे काय सांगतात; कोणाला बसणार धक्का ?

लोकसभेला जनतेनं आस्मान दाखविल्यानंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीनं पावले टाकली जात आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यातच मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शिंदे सरकारनं 'लाडकी बहीण' योजना लागू केली आहे. त्याअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रूपये दिले जाऊ लागले आहेत. योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधनाच्या पूर्वी महिलांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले.

पण, विधानसभेला महिला मतदारांची अधिकाधिक मते मिळवायची असतील, तर योजना जास्तीत जास्त महिलांपूर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याच्या कानाकोपऱ्यात मेळावे घेत आहेत. त्यासह योजनेचे आणखी किमान दोन-तीन हप्ते तरी महिलांच्या बँक खात्यात जमा होणे आवश्यक आहे.

Devendra Fadnavis | Ajit Pawar |  Eknath Shinde | Sharad Pawar|  Uddhav thackeray | Nana Patole
Assembly Election 2024 : आजघडीला निवडणुका झाल्यातर महायुती की 'मविआ', कोण ठरणार वरचढ? मोठा ओपिनियन पोल समोर

त्यापूर्वीच आचारसंहिता लागू झाल्यास मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे 'लाडकी बहीण' योजनेची योग्य आणि लाभदायी अंमलबजावणी करण्यासाठी शिंदे सरकारला पुरेसा वेळ मिळावा म्हणून विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये, झारखंडबरोबर घेतली जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com