BJP Shiv Sena conflict : शिंदेंच्या दिल्ली वारीनंतरही महायुतीला वाद आणखी चिघळला; भाजप-शिवसेनेत पळवापळवीचे राजकारण थांबेचना!

Maharashtra politics tension News: महायुतीमधील मित्रपक्षाकडून होत असलेल्या त्रासाचा थेट पाढाच वाचला. त्यानंतर युती धर्माच्या नियमाचे कोणीच उल्लंघन करू नका असा सल्ला शहा यांनी दिला.
Eknath shinde & devendra Fadanvis
Eknath shinde & devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्याचमुळे राज्यातील वातावरण ऐन थंडीतही चांगलेच तापले आहे. महायुतीमधील तीन पक्षात मतभेद असल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यातच बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीदरबारी जाऊन केंद्रीय गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महायुतीमधील मित्रपक्षाकडून होत असलेल्या त्रासाचा थेट पाढाच वाचला. त्यानंतर युती धर्माच्या नियमाचे कोणीच उल्लंघन करू नका असा सल्ला शहा यांनी दिला.

त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील मित्रपक्षातून होत असलेल्या इनकमिंगला ब्रेक लागेल असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा गुरवारीच महायुतीमध्ये 'धक्कातंत्र' कायम असल्याचे दिसते,. जामनेर नगरपालिकेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवारांना भाजपने प्रवेश दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना 'समोरा-समोर' आली आहे. त्यातच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टीका केली असल्याने संघर्ष शिगेला पोहचला आहे.

Eknath shinde & devendra Fadanvis
Sena–BJP Alliance : रत्नागिरीतील भाजप विरुद्ध शिवसेना वाद निकाली : रवींद्र चव्हाणांच्या मध्यस्थीने निघाला तोडगा

राज्यात गेल्या काही दिवसापासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर आहे. जळगावच्या जामनेरात नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी निवडणुकीत माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे, यावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

Eknath shinde & devendra Fadanvis
Shivsene : ठाकरे-शिंदे एकत्र येणार; संजय शिरसाट काय बोलून गेले?

जामनेर नगरपरिषद निवडणुकीत शिंदे सेनेच्या एबी फॉर्मसह अर्ज भरलेल्या वॉर्ड क्रमांक एकमधील मयूरी चव्हाण व वॉर्ड क्रमांक 13 मधील रेशंता सोनवणे या दोन महिला उमेदवारांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केल्याने, दुसरीकडे भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना माघार घेत भाजपमध्ये प्रवेश दिल्याने शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील तसेच तालुकाप्रमुखांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

Eknath shinde & devendra Fadanvis
NCP allegations : काँग्रेस, भाजपच्या माघारीसाठी धमक्या; पवारांच्या राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

भाजपने दडपशाही करून, प्रलोभने देऊन उमेदवारांना माघार घ्यायला लावली असा दावा शिवसैनिकांनी केला आहे. राज्यात एकीकडे नेते व पदाधिकारी पळवापळवीवरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये राजकारण तापले असतानाच आता जळगावच्या जामनेरात भाजपने सहकारी पक्षाचे उमेदवार आपल्या गळाला लावले आहेत, त्यामुळे भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घेऊ नये, अशा वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरलेले असताना देखील असे प्रवेश होत असतील तर ते चुकीचे आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Eknath shinde & devendra Fadanvis
NCP Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या गोटातून मोठे संकेत! महापालिका निवडणुकीसाठी नवा 'गेम चेंजर प्लॅन'?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com