Government Employees DA Hike : महायुती सरकारचा मोठा निर्णय! ; शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला!

Dearness Allowance Increased : जाणून घ्या, किती टक्के वाढ करण्यात आली आहे ; राज्य शासनाकडून परिपत्रक जारी करून यासंदर्भात सविस्तर माहिती दिली गेली आहे.
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Government Decision: राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. राज्य शासनाच्यावतीने यासंदर्भात एका परिपत्रकद्वारे माहिती दिली गेली आहे.

राज्य शासनाच्या आदेशात असे नमूद करण्या आले आहे की, १ जुलै २०२४ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५० टक्के वरून ५३ टक्के करण्यात यावा.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Shiv Sena Operation Tiger in Kolhapur : शिवसेनेने गुपचूप फोडली 'स्वाभिमानी', निष्ठावंत म्होरके गळाला अन् आता 'जनसुराज्य'च्या आमदारावरही दावा!

शिवाय सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी २०२५च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. तसेच महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढेही लागू राहील असे सूचित करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Sachin Kalyanshetti : मुख्यमंत्री फडणवीसांनी विधीमंडळ समित्यांमध्ये सचिन कल्याणशेट्टींकडे दिली महत्वपूर्ण जबाबदारी!

यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्या खालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हापरिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षकाखालील ज्या उपलेखाशीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उपलेखा शीर्षकाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. हा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे सांगण्यात आले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com