Shiv Sena Operation Tiger in Kolhapur : शिवसेनेने गुपचूप फोडली 'स्वाभिमानी', निष्ठावंत म्होरके गळाला अन् आता 'जनसुराज्य'च्या आमदारावरही दावा!

Political developments in Kolhapur : 15 मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार आहे.
Daryasheel Mane and Ashokrao Mane
Daryasheel Mane and Ashokrao ManeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena and Swabhimani Shetkari Sanghatana News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्ह्यात 'ऑपरेशन टायगर'ला सुरू आहे. 27 जानेवारी रोजी माजी आमदार सुजित मिणचेकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पण तत्पूर्वी शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनाही गुपचूप फोडली जात असल्याचे जाणवत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत उमेदवारीचा पेच निर्माण झाल्यानंतर नाराज झालेल्या मिणचेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हातात घेतला. पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सध्या कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्याची संपर्क मोहीम आणि सदस्य नोंदणीची मोहीम जबाबदारी खासदार धैर्यशील माने(Dhairyashil Mane) यांच्यावर सोपवली आहे. मात्र माने यांनीच स्वाभिमानीची खोलवर गेलेली मुळेच आता काढून टाकण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

मिणचेकर यांच्यापाठोपाठ माजी खासदार राजू शेट्टी(Raju Shetti) यांचे निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते असलेले हातकणंगलेचे माजी पंचायत समिती सभापती राजेश पाटील आणि त्यांच्या पत्नी महिला बालकल्याण समितीच्या सभापती पद्मा राणी पाटील यांना देखील शिवसेनेत घेतले आहे. नुकताच त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे.

Daryasheel Mane and Ashokrao Mane
Eknath Shinde: कोल्हापुरात दोन दिवसांत मोठा राजकीय भूकंप..? राजू शेट्टींना धक्का,कट्टर समर्थक नेता शिवसेनेच्या वाटेवर..?

राजेश पाटील हे हातकणंगलेचे पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत. 2017 च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या पद्माराणी पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. महत्त्वाचे म्हणजे पद्माराणी पाटील यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या पत्नी वेदांकिता माने यांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला होता.

नुकताच राजेश पाटील आणि पद्माराणी पाटील यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झालेला आहे. येत्या 15 मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार आहे.

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला(BJP) दोन, शिंदेंच्या शिवसेनेला चार, जनसुराज्य शक्तीला दोन तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या होत्या. मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेने हातकलंगलेतील पाचव्या जागेवरील आमदार देखील आपलाच असल्याचा दावा केला आहे.

Daryasheel Mane and Ashokrao Mane
Ramraje-Udayanraje : रामराजेंनी ‘तो’ फोटो स्टेट्‌सला ठेवत उदयनराजेंना दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा!

हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने हे जनसुराज्य शक्तीचे उमेदवार होते. मात्र ही जागा शिवसेना पुरस्कृत असल्याचे नुकतेच खासदार धैर्यशील माने पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यांच्या या दाव्याने अनेकांच्या भुवया आता उंचावल्या आहेत. वास्तविक पाहता आमदार अशोकराव माने यांची सर्वच पक्षांसोबत जिव्हाळ्याचे नाते आहे. मात्र शिवसेनेने केलेल्या दाव्यानंतर जनसुराज्य शक्ती पक्षाची भूमिका काय असणार हे पाहावे लागणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com