
मागील २४ तासांपासून अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत आहेत. अजित पवार काल रात्री ८ वाजता राजधानी दिल्ली दाखल झाले आहेत. अजुनही अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत भेट झालेली नाही. आज रात्री भेट होणार का हे पाहणं महत्वाच असणार आहे.
अजित पवार यांना मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भात अमित शाह यांची भेट घ्यायची आहे त्यासाठी अजित पवार दिल्लीत थांबले आहेत. अमित शाह आज सायंकाळी ६ वाजता चंदिगढवरून दिल्लीत पोहोचले आहेत.
महायुतीचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला अखेर ठरला असल्याची सूत्रांच्या हवाल्याने माहिती समोर आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद भाजपकडे, तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अन् नगरविकास मंत्रालय पाहणार आहेत. याशिवाय अजित पवारही उपमुख्यमंत्री राहणार असून त्यांच्याकडे अर्थ खातं दिलं गेलं असल्याची माहिती समोर येत आहे.
महायुतीच्या शपथविधीपूर्वी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे. वर्षा आणि सागर या शिंदे अन् फडणवीसांच्या बंगल्यांवर हालचाली सुरू आहेत. दरम्यान आता गिरीश महाजनांनंतर खुद्द देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर पोहचले आहेत.
भाजपचा गटनेता उद्या निवडला जाणरा आहे, म्हणजेच महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची उद्या घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. आज राज्यात भाजप चे निरीक्षक विजय रूपांनी व केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन येणार आहेत. थोडयाच वेळात मुंबई विमानतळावर होणार विजय रूपांनी यांच आगमन. विजय रूपानी यांच्या स्वागतासाठी भाजप आमदार श्रीकांत भारतीय देखील विमानतळावर दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादीला आठ मंत्री पदासोबत काही राज्यमंत्री पदं देखील मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे ९ मंत्रिपंदं होती. यंदा एखाद कॅबिनेट दर्जाच पद सोडल तरी राज्यमंत्री पद अधिक मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांशी अर्ध्या तासाहून अधिक वेळ संवाद साधला. उदय सामंत, संजय शिरसाट, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड यांच्याशी शिंदे बोलले. याशिवाय त्यांच्या भेटीला विजय शिवतारे, अर्जुन खोतकरही आले होते. एकनाथ शिंदेंनी उद्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे.
महाराष्ट्र भाजपचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. आज ते नेमका कोणत्या निरोप घेवून आले आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात आता राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे आमदार जमण्यास सुरुवात झाली आहे आणि आता त्यांची एक बैठकही होणार आहे.
राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. शपथविधी सोहळ्याची तयारी जोरदार सुरु आहे. या सोहळ्यासाठी ४० हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक राज्याचे मुख्यमंत्री, साधुसंत या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 'एक है तो सेफ हैं" आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट परिधान केलेले 10 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या खटल्याची सुनावणी २२ जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे. या सुनावणीकडे राज्यातील सगळ्याचे लक्ष लागले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणामुळे अनेक वर्षावर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना ज्यूपिटर रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिंदेंना दोन दिवस आराम करण्याता सल्ला डॅाक्टरांनी दिला आहे. त्यांची डेंगी, मलेरिया याची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना सध्या अशक्तपणा जाणवत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॅाक्टरांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना १०५ डिग्री ताप आला होता, दरे गावात त्यांच्यावर उपचार झाले. पण मुंबईत परतल्यानंतरही शिंदे यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही.
महायुतीच्या शपथविधीला देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील काही खास लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये फडणवीसाचे फॅन असलेले गोपाल बावनकुळे हे सुद्धा आहेत. गोपाल बावनकुळे हे रामनगर परिसरामध्ये चहाचा स्टॉल चालवतात.
आमदार भरत गोगावले हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यातील निवासस्थानी गेले आहेत. तर गोगावले यांची श्रीकांत शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती आहे.
नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आता शिंदेंची शिवसेना सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील हे आझाद मैदानावर पहाणीसाठी जाणार आहेत. भाजप नेत्यांसोबत ते आज या मैदानाची पाहणी करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना अलिप्त राहिल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय दीपक केसरकर यांनी मैदान पाहणीवरून नाराजी दर्शवली होती. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते मैदान पहाणीसाठी जाणार असल्यामुळे चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
मारकडवाडीत पोलिस प्रशासन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांच्याच बंद दाराआड सुरू होती. पोलिसांकडून मतदान प्रक्रियेला विरोध केल्यानंतर ही चर्चा सुरू होती. या चर्चनंतर मारकडवाडी येथील मतदान प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तर येत्या आठ दिवसात 25 ते 50 हजार नागरिकांसमवेत माळशिरस तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा यावेळी उत्तम जानकर यांनी केली आहे.
मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी ग्रामस्थ एकवटले होते. मात्र अखेर इथली मतदान प्रक्रिया प्रशासनाकडून थांबवण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेल्याची माहिती आहे. मात्र, काल रात्रीच शाह चंदिगढला रवाना झाले आहेत. भारतीय दंड सहिता संदर्भातील आयोजित केलेल्या संमेलनात शाह सहभागी होणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी 11 वाजता या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे आता अजितदादा दिल्लीत कोणाला भेटणार हे गुलदस्त्यात आहे. काल रात्री अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची बैठक झाली होती.
मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. मात्र, अद्याप मतदान प्रक्रियेला सुरूवात झालेली नाही. आम्हाला मतदान करायचं आहे, शासन आम्हाला मतदान का करू देत नाही? काहीतरी चुकीचं घडलंय म्हणून आम्हाला मतदान करायचं आहे, असं गावकरी म्हणत आहेत.
महायुतीच्या शपथविधीची महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे. शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण राज्यातील प्रमुख नेत्यांना दिले जाणार आहे. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर, जयंत पाटील यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांसह सिनेसृष्टी, क्रीडा क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ही निमंत्रण दिले जाणार आहेत.
माळशिरसमधील मारकडवाडीतील गावकऱ्यांनी ईव्हीएम वर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पाडण्याची भूमिका घेतली आहे. प्रशासनाने मात्र या प्रक्रियेला विरोध केला आहे. त्यामुळे 5 डिसेंबरपर्यंत मारकडवाडीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे. तर दुसरीकडे आम्हाला गोळ्या घातल्या तरीही आम्ही बॅलेट पेपरवर मतदान करणार असल्याची भूमिका मारकडवाडीतील गावकऱ्यांनी घेतली आहे. आज . सकाळी 8 ते 4 मतदान आणि 4 ते 5 मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. बॅलेटपेपरवर मतदान घेण्यास मारकडवाडी गावाला प्रशासनाने विरोध केलाय. गावात संचारबंदी लागू केली आहे. मात्र गावकरी मतदानावर ठाम असून बॅलेटसाठी बुलेट झेलू असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. ईव्हीएम विरोधात आज बॅलेट पेपरवर मतदान पार पडलं तर मारकरवाडी असं मतदान घेणारं देशातील पहिलं गाव ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.