Congress News : राहुल गांधींसमोरच केली खर्गेंनी मोठी घोषणा; 'लाडक्या बहि‍णींना महिन्याला देणार...'

Political News : सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत महाराष्ट्रात येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग काँग्रेसने फुंकले आहे.
Mallikarjun Kharge, Rahul Gandhi, Sharad Pawar
Mallikarjun Kharge, Rahul Gandhi, Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Sangali News : सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत महाराष्ट्रात येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग काँग्रेसने फुंकले आहे. येत्या काळात जर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी घोषणा केली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित सांगलीतून भाषण करताना काँग्रेसचे राष्ट्राय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी येत्या काळात आमचं सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहि‍णींना दोन हजार रुपये महिन्याला देऊ, अशी घोषणा केली. (Congress News)

सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार (Sharad Pawar), नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. सांगलीतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे त्यांच्या कामाच्या निमित्ताने गैरहजर होते.

यावेळी राहुल गांधी यांनी आक्रमकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यांच्यावर टीका केली. तसेच, राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्यासंदर्भात आणि लाडकी बहीण योजनेबाबतही भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे 1 लाख 70 हजार मतांनी जिंकले आहेत. मात्र, विश्वजीत कदम हे एका विधानसभेत 1 लाख 40 हजार मतांनी जिंकल्याचं सांगत खर्गे यांनी मोदींवर टीका केली.

Mallikarjun Kharge, Rahul Gandhi, Sharad Pawar
Rahul Gandhi News : मोदीजी,यासाठीही महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागा; राहुल गांधींचा जोरदार टोला

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हात लावला तो पडला, ⁠राम मंदिराला हात लावला ते गळत आहे, गुजरातच्या पुलाचं उद्घाटन केल तर तो पुल पडला, ⁠मोदी येत आहेत, म्हणून पुतळा लवकर बनवा आणि तो बनवला आणि पडला, असे म्हणत पुतळा कोसळल्यावरुन नरेंद्र मोदी यांना त्यांनी लक्ष्य केले. ⁠

लाडक्या बहि‍णींना 2 हजार रुपये देणार

येत्या काळात राज्यात आमचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेसाठी तुम्हाला 2 हजार रुपये देणार, तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर गहाण ठेवणार आहे का, ⁠मोदी सरकारने तोडण्या फोडण्याच्या पलिकडे काय केल ते सांगा, महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपच सरकार जाईल, असेही खर्गे यावेळी म्हणाले. यावेळी, राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली. या योजनेतील पात्र महिलांना 2000 रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

लोकसभेला 20 जागा मिळाल्या असत्या तर..

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ⁠आणखी 20 जागा मिळाल्या असत्या तर मोदी सरकार दिसले नसते, खरी शिवसेना आमच्यासोबत आहे, खरी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत आहे, ⁠भाजपच्या बाजूने सर्व नकली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत लक्षात ठेवा, असेही यावेळी खर्गे म्हणाले.

Mallikarjun Kharge, Rahul Gandhi, Sharad Pawar
BJP News : भाजपचा पाय खोलात; विधानसभेच्या तोंडावर 'नाफेड'ने कांद्याचे दर पाडले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com