Devendra Fadnavis: फडणवीसांना 'आशिकी'ची भुरळ! नार्वेकरांच्या गाण्याला आमदार-नेत्यांची दाद

Rahul Narwekar & Devendra Fadnavis enjoying the hurda vibes:मंगलप्रसाद लोंढा यांनी हुरडा पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला सर्वपक्षीय आमदार, नेत्यांना लोंढांनी निमंत्रण दिले होते. विविध पक्षांतील आमदार, मंत्री आणि नेते या पार्टीला उपस्थित होते.
Rahul Narwekar & Devendra Fadnavis enjoying the hurda vibes
Rahul Narwekar & Devendra Fadnavis enjoying the hurda vibesSarkarnama
Published on
Updated on

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार, नेते सध्या नागपुरात मुक्कामी आहे. अधिवेशन संपल्यानंतर काहीसा विरगुंळा व्हावा, म्हणून भाजपचे आमदार मंगलप्रसाद लोढा यांनी मंगळवारी रात्री हुरडा पार्टीचे आयोजन केले होते. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही हुरडा पार्टी गाजवली.

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सलग दुसऱ्यांदा मंगलप्रसाद लोंढा यांनी ही हुरडा पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला सर्वपक्षीय आमदार, नेत्यांना लोंढांनी निमंत्रण दिले होते. विविध पक्षांतील आमदार, मंत्री आणि नेते या पार्टीला उपस्थित होते. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी सुरात-सुर मिसळले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी व्यासपीठावर "एक दिन मिट जायेगा माती के मोल" हे गाणे म्हटले, त्यांनी उपस्थित आमदार, नेत्यांची मने जिंकली. नार्वेकरांचे गाणे संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायक कुमार सानू यांच्या गाण्याची फर्माईश केली. आशिकी चित्रपटातील गाण्याची फर्माईश मुख्यमंत्र्यांनी केली. कार्यक्रमात नव्वदच्या दशकातील गाण्याची फर्माईश मुख्यमंत्र्यांनी केली.

Rahul Narwekar & Devendra Fadnavis enjoying the hurda vibes
BJP Politics: वाढती इनकमिंग भाजपची चिंता वाढवणारी; आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का? कार्यकर्त्यांच्या भावना

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने सुयोग प्रांगण, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित या ‘हुरडा पार्टी’ कार्यक्रमात राजकारणासोबत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. एकमेंकाशी संवाद साधत आणि पारंपरिक हुरड्याचा आस्वाद घेत पार्टीचा आनंद लुटला.

Rahul Narwekar & Devendra Fadnavis enjoying the hurda vibes
MNS cash bomb: मनसेकडून ‘कॅश बॉम्ब’ची मालिका सुरुच! संदीप देशपांडेंकडून PWD अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा VIDEO शेअर

अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. कालचा दिवस (मंगळवार) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी व्हिडिओ शेअर करीत शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यावर ‘कॅश बॉम्ब’टाकला.त्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही ‘कॅश बॉम्ब’टाकला. आजही देशपांड यांनी ‘कॅश बॉम्ब’टाकत पीडब्लूडी विभागातील लाचखोर अधिकाऱ्याचा भांडाफोड केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com