
Mumbai News : मुंबईतील आझाद मैदानातील आमरण उपोषणाच्या निमित्ताने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातील मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. तर सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार व खासदार यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
येत्या काळात राज्य सरकारने तुरुंगात टाकले तरी मी तुरुंगातही उपोषण करणार आहे. मला गोळ्या घातल्या तरी मी त्या झेलणार आहे. मी सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारला इशाराच दिला. त्यासोबतच मुंबईत येत्या काळात आणखी आंदोलक येणार असून मंगळवारपासून सात टप्प्यात आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने राज्य सरकारचे टेन्शन आणखी वाढणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील आमरण उपोषणालाआंदोलनाला राज्य सरकारने आणखी एका दिवसाची मुदतवाढ दिली आहे. सध्या जरांगे उपोषणस्थळी बसलेले आहेत. तर दुसरीकडे आझाद मैदानाचा परिसर, सीएसएमटी अशा महत्त्वाच्या भागात आंदोलक थांबलेले आहेत. काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराच जरांगे यांनी राज्य सरकारला दिला.
त्यासोबतच येत्या काळातील आंदोलनाच्या आगामी दिशेबद्दलही सांगितले. येत्या काळात काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराच जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच हा इशारा देताना त्यांनी त्यांच्या आंदोलनाच्या आगामी दिशेबद्दलही सांगितलं आहे. हे आंदोलन पुढे गेले तसेच मागण्या मान्य करण्यास विलंब लावला तर सरकारच्या अडचणी वाढतील, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे.
मराठा समाजाशी संवाद साधताना त्यांनी मंगळवार, बुधवारनंतर आणखी खूप लोक मुंबईत येणार आहेत. सरकारने न ऐकल्यास हे लोक येणार आहेत. तुम्ही आंदोलनाला एका-एका दिवसाची मुदतवाढ देऊन काहीही उपयोग नाही. तुम्ही आमच्या मागण्यांच्या अंमलबजावणीला वेळ लावला तर मराठे मुंबईकडे येत राहणार आहेत. तसेच मी खोटं बोलत नाही. आरक्षणाला जसा-जसा विलंब लागले तसे-तसे लोक काम सोडून मुंबईकडे येणार आहेत, हा पहिला टप्पा आहे. यानंतर आंदोलनाचे आणखी सात टप्पे असणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट करीत इशारा दिला आहे.
राज्य सरकारच्या भूमिकेकडे लागले लक्ष
तुम्ही मला तुरुंगात टाका. मी तुरुंगातही उपोषण करणार आहे. मला गोळ्या घातल्या तरी मी त्या झेलणार आहे. मी सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असा इशाराच जरांगे यांनी दिला. त्यामुळे आता जरांगे यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकार नेमके काय करणार? याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.