Shambhuraj Desai On Manoj Jarange : मनोज जरांगेंना 100 कोटींचा संशय; शंभुराजे म्हणाले, "कारवाईच करतो"

Shambhuraje Desai Will Take Action On Manoj Jarange Complaint Of 100 Crores : मराठा आरक्षणाच्या नावाखाली काहींनी 100 कोटी रुपये गोळा केल्याचा संशय मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. मंत्री शंभुराज देसाई यांनी याची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांसमोर मराठा आरक्षणाबाबत मुद्दे मांडणार असल्याचेही सांगितले.
Shambhuraj Desai On Manoj Jarange
Shambhuraj Desai On Manoj Jarangesarkarnama

Shambhuraj Desai News : मराठा आरक्षणाच्या नावाखाली 100 कोटी गोळा केल्याचा संशय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. "हा मोठा विषय आहे. याबाबत चौकशी होणार आहे. ती आम्ही करतोय आणि यात कारवाई करतोच. मनोज जरांगे यांच्या नावाचा गैरफायदा कोणी घेत असेल तर, त्यावर कारवाई करणारच", असे शिवसेना नेते मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी लढा उभारलेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी सगेसोयरे केलेली व्याख्या आहे. मुख्यमंत्री यांनी याबाबत अधिसूचना काढली आहे. यावर हरकती देखील मागवल्या आहेत. त्याची छाननी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जो शब्द दिला आहे, तो पूर्ण केला जाणार आहे, असे शंभुराजे देसाई यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांनी भेटीत मराठा आरक्षणाच्या नावाखाली काहींनी 100 कोटी रुपये गोळा केल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा गंभीर विषय आहे. मनोज जरांगे यांच्या नावाचा कोणी गैरफायदा घेत असेल, तर हा विषय छोटा नाही. याची दखल आम्ही घेतली आहे. आम्ही याबाबत चौकशी करून गंभीर कारवाई करूच, असे शंभुराजे देसाई यांनी सांगितले.

Shambhuraj Desai On Manoj Jarange
Nagpur Assembly Election : नागपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकून राष्ट्रवादीने वाढवलं भाजपचं टेन्शन!

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. शंभुराज देसाई यांच्या उपस्थित मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी मनोज जरांगे यांनी आरक्षणाबाबत असलेल्या मागण्यांवर कार्यवाहीसाठी एक महिन्यांची मुदत दिली. याचवेळी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या नावाखाली काहींनी 100 कोटी रुपये उकळल्याची तक्रार शंभुराज देसाई यांच्याकडे केली. मनोज जरांगे यांच्या या संशयानंतर मराठा समाजात एकच खळबळ उडाली आहे.

Shambhuraj Desai On Manoj Jarange
Sharad Pawar : ...म्हणून शरद पवारांनी मानले मोदींचे आभार

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहे. काही भागात आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे बैठक बोलावून सुद्धा विषय घेता येत नाही. मराठा आरक्षणाबाबत काही मुद्दे तयार करण्यात आले आहे. तशी नोंदच करून ठेवली आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी होणार आहे. या बैठकीत हे मुद्दे आपण सादर करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हे मुद्दे अवलोकनासाठी ठेवू. यानंतर त्यांचा अभिप्राय करून पुढील प्लॅन तयार मराठा आरक्षणाबाबत कार्यवाही करू, असे शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com