Rohit Pawar : 'पवार'जे बोलतात तेच करतात; रोहित म्हणाले, 'यंदाची दिवाळी बारामतीत नव्हे तर...

Baramati News : "युवा संघर्ष यात्रे"ची घोषणा आणि सुरुवात पुणे जिल्ह्यातून केली होती.
Rohit Pawar News
Rohit Pawar NewsSarkarnama

Nagar: "माझ्या नावात रोहित आहे, पण त्याला नव्हे तर नावात असलेले 'पवार' याला जास्त महत्व आहे. ती एक सामाजिक भान असलेली जबाबदारी असते. आणि त्यामुळे मी यंदा "युवा संघर्ष यात्रे" दरम्यानच दिवाळीचा सण येत असला तरी सण बारामतीत साजरा न करता यात्रेय त्या काळात असेल तिथे दिवाळी सण जनता आणि सहकारी कार्यकर्त्यांसोबतच साजरा करणार असा शब्द दिला होता. हे सांगतानाच यंदाची दिवाळी बारामतीत नाही याचा पुनरुच्चार आमदार रोहित पवार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला.

गेल्या महिन्यात दसऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील युवा वर्गाच्या विविध प्रश्नांवर जनजागृती व्हावी आणि युवा वर्गाचे शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, उद्योगांसाठी कर्ज आदी विषयामुळे आवाज उठवण्यासाठी "युवा संघर्ष यात्रे"ची घोषणा आणि सुरुवात पुणे जिल्ह्यातून केली होती.

राज्यातील अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवले जात असल्याचा आरोप रोहित यांनी करत उच्च शिक्षण घेऊनही रोजगार मिळत नसल्याने युवा वर्गात नैराश्य वाढत आंबे, त्यातून युवा नको ते टोकाचे निर्णय घेत आहेत.ड्रग्ज सारखे अवैध उद्योग या परिस्थितीचा गैर फायदा घेत आहे. सरकार यावर कसलीही उपाययोजना करत नसताना युवा वर्गात आहे त्या परस्थितीला तोंड देत कसा मार्ग काढता येईल याची जनजागृती करण्यासाठी आ.रोहित पवारांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर युवा संघर्ष यात्रा सुरू केली.

Rohit Pawar News
Kolhapur: थेट पाईपलाईन कामाची ED चौकशी करा; क्षीरसागरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र...

यात्रा पुणे जिल्ह्यातून जोमाने सुरू असतानाच मराठा आरक्षण मुद्यावर राज्यातील वातावरण तणावपूर्ण झाले. नागरिकांनी नेत्यांना तीव्रपणे गावबंदी केली. त्यामुळे चुकीचा संदेश जायला नको म्हणून संघर्ष यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला असे आ.रोहित यांनी सांगितले.

मात्र आता काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मागे झाले आणि राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आली. त्यामुळे येत्या 17 नोव्हेंबर पासून युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रोहित यांनी दिली आहे.

संघर्ष यात्रा सुरू करण्यापूर्वीच यंदाची दिवाळी ही बारामती मध्ये नव्हे तर असेल तिथे जनतेसोबत साजरी करणार असल्याची घोषणा केली होती. 'पवार' जे बोलतात ते करतात असे सांगताना यंदाची दीपावली ही बारामती मध्ये नव्हे तर नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड अशी संघर्ष वाटेवर जनतेसोबत साजरी करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

रोहित पवार दोन दिवसांपासून कर्जत-जामखेडमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी चौंडी इथे सकाळीच दीपोत्सव साजरा केला. त्यानंतर ते अंबडकडे रवाना होणार असून तिथे मत्स्योदरी देवीचे दर्शन घेणार आहेत तर सायंकाळी राजमाता जिजाऊ यांच्या सिंदखेडराजा येथे दीपोत्सव साजरा करणार आहेत.

14 नोव्हेंबरला बीड मध्ये ..

त्यानंतर 13 नोव्हेंबरला यवतमाळ मध्ये ग्रामहित संस्थांना भेट तर 14 नोव्हेंबरला बीड मध्ये हिंसक घटनेत जाळपोळ झालेल्या राष्ट्रवादी कार्यालयाला भेट देणार आहेत. या ठिकाणी ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार क्षीरसागर यांच्या कुटुंबासोबत सहपरिवार दीपावली साजरी करणार असल्याची माहिती आहे. भाऊबीज सणासाठी रोहित पवार हे पारनेरला निघोज येथील कुंडमाऊली स्थळी येणार आहेत.

Rohit Pawar News
Jalna: नेत्यांच्या गावबंदीचं पोस्टर फाडलं, दोन गटात हाणामारी, सरपंचासह सात जण जखमी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com