Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंवर केलेल्या वक्तव्यामुळे मनोज जरांगेंवर सलग दुसरा गुन्हा दाखल

Manoj Jarange Second Consecutive Case in Beed : काल धनंजय मुंडे समर्थकांनी परळी शहर पोलिस स्टेशनसमोर जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत आंदोलन केले होते.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

परभणी येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी न्याय मागण्यासाठी निघालेल्या सर्वपक्षीय आक्रोश मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेंविरोधात परभणीत वादग्रस्त वक्यव्य केलं. मनोज जरांगे पाटील हे जातीयवाद करत असून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे काल धनंजय मुंडे समर्थकांनी परळी शहर पोलिस स्टेशनसमोर जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत आंदोलन केले.

मुंडे समर्थक हे रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसले होते. या ठिय्या आंदोलनात त्यांच्याबरोबर महिला देखील सामील झाल्या. अखेर पहाटे 3 वाजता धनंजय मुंडेंविरोधात परभणीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगेंवर (Manoj Jarange) बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil
Ladki Bahin Yojana : 'खटाखट नाही, तर पटापट'!, 2100 रुपये देणार'; फडणवीस यांच्या मंत्र्याने थेट महिनाच सांगितला

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्याचबरोबर जर देशमुख कुटुंबीयांना त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही दिला होता. त्यामुळे जरांगेंवर सलग दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते मनोज जरांगे?

परभणीच्या मोर्चामध्ये बोलताना मनोज जरांगे म्हणाले होते की, "देशमुखांना तुम्ही धमक्या देताय? त्याचा भाऊ गेला आणि तो न्यायासाठी लढतोय, वणवण फिरतोय. त्याला तुम्ही धमक्या देताय. संतोष भैयाचे भाऊ जेव्हा पोलिस (Police) ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले.

Manoj Jarange Patil
Mahayuti News : ...तर आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू; महायुतीमधील बड्या नेत्याने दिला इशारा

यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा. परळी असो की बीड, इथल्या समाजाला ही त्रास झाला तर घरात घुसून मारायचे. देशमुख कुटुंबीयांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. आम्ही फक्त कायद्याला मानतोय, म्हणून आम्ही शांत आहोत. सगळे आरोपी पकडले जातील, फासावर जातील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com