Mahayuti News : ...तर आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू; महायुतीमधील बड्या नेत्याने दिला इशारा

Ramdas Athawale Statement : कॉंग्रेसच्या काळात आम्हाला विधान परिषद मिळाली, भाजपसोबत गेल्यानंतरही आम्हाला एक विधान परिषद मिळाली. रिपब्लिकन पक्षाला तीन महामंडळे मिळावीत, अशी आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 06 January : राज्याच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) मंत्रिपद मिळायला हवे होते. ते न मिळाल्याने कार्यकर्ते आणि मी नाराज आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आम्हाला न्याय द्यावा. आम्ही महायुतीसोबत आहे. मात्र, आम्हाला सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवू, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. तेथील पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. ते म्हणाले. नागपूर, अमरावती महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आपले उमेदवार तयार ठेवावेत. भारतीय जतना पक्षाच्या जिल्हाध्यक्षांशी बोलावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे. या निवडणुकांत शिवसेना, राष्ट्रवादी भाजपसोबत राहील की नाही माहिती नाही. मात्र रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत राहणार आहे.

कॉंग्रेसच्या काळात आम्हाला विधान परिषद मिळाली, भाजपसोबत (BJP) गेल्यानंतरही आम्हाला एक विधान परिषद मिळाली. महामंडळ मिळावीत, अशी अपेक्षा आहे. रिपब्लिकन पक्षाला तीन महामंडळे मिळावीत, अशी आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, असेही आठवले यांनी नमूद केले.

Ramdas Athawale
Solapur DCC Bank : राजन पाटील, साळुंखे, मानेंची सहकार मंत्र्यांशी बंद खोलीत चर्चा; पाटील म्हणतात ‘मेरिटवर निर्णय होईल; वशिलावर नाही’

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने निकाल दिला आहे, त्याबद्दल मतदारांचे आभार. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला 17 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र,विधानसभेमध्ये संविधानाचा मुद्दा चालला नाही. दलित, बौद्ध, ओबीसी, आणि मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं आहे, असा दावाही आठवले यांनी केला.

आठवले म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्हाला 165 जागा मिळतील, असं वाटलं होतं. मात्र, आम्हाला 200 पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहे. महाविकास आघाडी ईव्हीएमवर दोष देत आपल्या चुका लपवीत आहे. देवेंद्र फडणवीस हे दलित समाजाच्या विकासासाठी काम करतील, अशी अपेक्षा आहे.

Ramdas Athawale
Sudhir Mungantiwar : ...तेव्हाच मी राजकारण सोडण्याचा विचार केला होता; मुनगंटीवारांनी बोलून दाखवली मनातील गोष्ट

देवेंद्र फडणवीस सामंजस्य नेते आहेत. नक्षलप्रभाव कमी केला जातोय. नक्षलवाद्यांच्या हिंसक हल्ल्याला आमचा विरोध आहे. नक्षलवाद उखडून फेकला पाहिजे. नक्षलवाद्यांनी आपले काम सोडून मुख्य प्रवाहात यावे. निवडणूक लढावावी, असे आवाहनही रामदास आठवले यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com