Maratha Reservation : "एकदा आंदोलन संपू द्या, त्या चिचुंद्रीकडे बघतोच" नितेश राणेंना जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange Patil On Nitesh Rane : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांनी आणखी कडक उपोषणाचा इशारा दिला आहे.
Nitesh Rane And Manoj Jarange Patil
Nitesh Rane And Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले असून राजकारणात खळबळ माजली आहे.

  2. भाजप मंत्री नितेश राणेंनी केलेल्या टीकेवर जरांगे पाटलांनी पलटवार करत त्यांना “चिंचुद्री” म्हटलं.

  3. आंदोलन संपल्यानंतर राणेंना पाहूच असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

Mumbai News : आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. उपोषणाचा रविवार (ता. 31) तिसरा दिवस आहे. तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो समाज बांधव मुंबईत दाखल झाले. दरम्यान आता जरांगे यांनी उपोषण आणखी कडक करण्याचा इशारा दिला असून पाण्याला देखील हात लावणार नसल्याचे सांगितले आहे. अशातच टीका करत इशारा देणाऱ्या मंत्री नितेश राणे यांचा समाचार जरांगे यांनी घेतला आहे. त्यांनी मंत्री राणे यांचा चिंचुद्री असा उल्लेख करताना आंदोलन संपलं की याला बघतोच, असा दम भरला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र काढले आहे. सध्या त्यांचे मुंबईच्या आझाद मैदानवर गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तीन दिवस सुरु असून आज त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी अनेक राजकाराण्यांचा समाचार घेतला. तसेच भाजपचे नेते तथा मंत्री नितेश राणेंनी केलेल्या टीकेवर मोजक्यात शब्दात पलटवार करताना केला. जरांगे यांनी राणेंना प्रत्युत्तर देताना त्यांचा उल्लेख चिंचुद्री असा केला.

Nitesh Rane And Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवताच जरांगे संतापले, म्हणाले "स्वत:चं पोरगं पाडलं, किती दिवस भाजपची..."

चिंचुद्रीचे कधी पाय मोजता आले आहे का? तिचा पायाचा मेळच लागत नाही. चिंचुद्री सर्व ऋतूत लाल असते. शिवाय ती काय म्हणते हे देखील कळत नाही. यामुळे एकदा आंदोलन संपू द्या, त्या चिंचुद्रीकडे बघतोच. असा सज्जड दम नितेश राणेंना यावेळी जरांगे यांनी भरला आहे.

वाद कसा झाला?

जरांगे यांनी आदोलनाची घोषणा करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांनाही लक्ष करत आहेत. याच दरम्यान त्यांनी आमच्या आया-बहिणींवर पोलिसांनी हल्ले केले तेव्हा फडणवीस तुम्ही कोठे गेले होतात? असा हल्लाबोल करताना फडणवीस यांच्या मातोश्रींचा उल्लेख केला होता. त्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी थेट इशाराही दिला होता.

नितेश राणे यांनी, जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. ज्या छत्रपतींचा आपण आदर करतो, त्यांनीही कायम आई-बहि‍णींचा आदर केला. जरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई जरूर लढावी. मात्र, आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत करू नये. तसेच कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देऊ. तेवढे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे. याचे भान जरांगे यांनी ठेवावे, असा इशारा राणेंनी दिला होता. याच इशाऱ्यावर आता जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Nitesh Rane And Manoj Jarange Patil
पोलिसांनी गाड्या अडवल्या, मराठा आंदोलक ढसाढसा रडले, Manoj Jarange Patil, Maratha Andolan, Mumbai

FAQs :

प्र.१. जरांगे पाटलांनी नितेश राणेंबद्दल काय म्हटलं?
उ. त्यांनी राणेंना “चिंचुद्री” म्हणत आंदोलन संपल्यानंतर बघतोच असा इशारा दिला.

प्र.२. आंदोलन कुठे सुरू आहे?
उ. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे.

प्र.३. आंदोलनाचा उद्देश काय आहे?
उ. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com