Manoj Jarange : भुजबळांना डावललं, जरांगेंची 'मोठी' प्रतिक्रिया; उद्या मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची तारीख जाहीर करणार

Manoj Jarange NCP Chhagan Bhujbal Mahayuti government cabinet and Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात डावलण्यावर आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया दिली.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात डावलले गेले. यामुळे भुजबळ चांगलेच नाराज आहे. त्यांनी ही नाराजी जाहीरपणे व्यक्त केली असून, नागपूर अधिवेशनात ते सहभाग झाले नाहीत.

यावर आता मराठा आरक्षणासाठी सरकारबरोबर संघर्ष करणारे मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याचे सांगितले.

ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. "छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही, हा आमचा प्रश्न नाही. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याच आम्हाला देणं-घेणं नाही", असे मनोज जरांगे यांनी म्हटले. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी दोन ते दीड वर्षांपासून संघर्ष उभारला आहे, मोर्चे काढत आहेत. उपोषण करत आहेत. ओबीसीतून आरक्षण मिळावं, यावर जरांगे ठाम आहेत. तर दुसरीकडे आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींनी उभारलेल्या लढ्यात छगन भुजबळ यांनी देखील उडी घेतली आहे. यातून उफाळलेला जरांगे अन् भुजबळ यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे.

Manoj Jarange
Ravi Rana : बॅग भरली अन् रवी राणा अमरावतीला रिटर्न; मंत्रि‍पदाची संधी हुकल्याने नाराज

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) संघर्ष सुरू असल्याचा मनोज जरांगेंनी सांगितले. मराठा आरक्षण घेण्यासाठी आता आम्ही सामूहिक आमरण उपोषण आंदोलन सुरू करत आहोत. या आंदोलनाची तारीख उद्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. ज्यांना स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल, असं देखील जरांगे यांनी म्हटले.

Manoj Jarange
Chhagan Bhujbal : 'कोण वरिष्ठ? मैं नाराज हूं, अजितदादांबरोबर चर्चेची गरज नाही'; भुजबळांची टोलेबाजी अन् ओबीसी समाजाचा 'रास्ता रोको'

उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नसून सामूहिक आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसलं, तरी मी बसणार आहे, असे जरांगे यांनी भूमिका जाहीर केली आहे. उपोषणाला बसा म्हटलं, तर घराघरांतून मराठे उपोषणाला बसतील. असा विश्वास देखील जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा, असं आवाहन करताना या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढेल, अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे, याकडे देखील जरांगे यांनी लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com