Ravi Rana : बॅग भरली अन् रवी राणा अमरावतीला रिटर्न; मंत्रि‍पदाची संधी हुकल्याने नाराज

Amravati Ravi Rana Nagpur Winter session mahayuti government BJP CM Devendra Fadnavis : महायुती सरकारमध्ये मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्याने रवी राणा नाराज असून, ते नागपूर अधिवेशनात सहभागी न होता अमरावतीला पुन्हा निघून आले.
Ravi Rana
Ravi RanaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अमरावतीमधील युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा सीएम देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार रवी राणा मंत्रीपद मिळाले नसल्याने नाराज आहेत.

नागपूर अधिवेशनात सहभागी न होता, अमरावतीला रिटर्न आले आहेत. अमरावतीमधील गंगा-सावित्री निवासस्थानी रवी राणा तळ ठोकून असून, तिथं त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

आमदार रवी राणा यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशा अपेक्षा होती. परंतु कालच्या मंत्रिमंडळ शपथविधीत त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे ते नाराज असून, ते नागपुरातून (Nagpur) पुन्हा अमरावतीला गेले. नागपूरमधील आजच्या अधिवेशनात आज ते सहभागी झाले नाहीत. उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे राणा दाम्पत्याच्या होता मोठा हात होता. नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर निवडून आल्यावर केंद्रात भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र आता रवी राणा यांना मंत्रीपद न मिळाल्याने राणा दाम्पत्य नाराज आहे.

Ravi Rana
Chhagan Bhujbal : 'कोण वरिष्ठ? मैं नाराज हूं, अजितदादांबरोबर चर्चेची गरज नाही'; भुजबळांची टोलेबाजी अन् ओबीसी समाजाचा 'रास्ता रोको'

नागपूरवरून नाराज होऊन आलेले रवी राणा (Ravi Rana) कालच अमरावतीला आले, असून ते त्यांच्या गंगा-सावित्री निवासस्थानी आहेत. रवी राणा यांच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे गर्दी केली असून बैठकांचा सपाटा सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात आठ पैकी सात जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. यासाठी राणा दाम्पत्याने मोठी मेहनत घेतली. यावर देखील रवी राणा यांना मंत्रि‍पदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज आहे. रवी राणा त्यांच्या अमरावतीमधील गंगा-सावित्री निवास्थानी जमलेल्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. रवी राणा गेल्या पंधरा वर्षापासून भाजप महायुतीबरोबर आहेत.

Ravi Rana
Nagpur Winter Session : खातेवाटपाचा तिढा सुटेना; अन् अधिकाऱ्यांना पडला वेगळाच प्रश्न

रवी राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तींपैकी एक मनाले जातात. फडणवीस यांच्याकडून त्यांना स्थानिक राजकारणात नेहमीच झुकते माप मिळाले. यातून स्थानिक भाजप नेत्यांची फडणवीसांनी नाराजी देखील ओढवून घेतली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाला. यानंतर देखील भाजपने विधानसभेच्या निवडणुकीत दमदार कामगिरी केली. अमरावतीत भाजपचे पाच आमदार निवडून आले. रवी राणा हे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे यावेळी त्यांना मंत्रीपद मिळणार, अशी चर्चा होती. पण त्यांची निराशा झाली.

भाजप महायुतीमध्ये अनेक घटक पक्ष आहेत. यात महायुतीचे घटक असलेल्या विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत. पण विनय कोरे यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. रवी राणा यांना मंत्रिपदावर संधी दिल्यावर इतर घटक पक्षांची नाराजी देखील समोर येऊ शकते. त्यामुळे यावेळी त्यांचे मंत्रिपद हुकल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com