Raosaheb Danve News : मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढणार? रावसाहेब दानवे म्हणाले, 'जनता पाठिंबा...'

Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पेक्षा अधिक जागा मिळतील यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्रात देखील महायुती 45 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असे रावासाहेब दानवे म्हणाले.
Manoj Jarange  Raosaheb Danve
Manoj Jarange Raosaheb Danvesarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election : 'सगेसोयरे'ची अंमलबजावणी केली नाही तर विधानसभेच्या 288 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी केली होती. जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर सत्ताधारी भाजप काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून BJP अजून यावर कोणी काही प्रतिक्रिया दिली नसताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange  Raosaheb Danve
Jalgaon Lok Sabha Constituency : निवडणूक लोकसभेची, परीक्षा मात्र गिरीश महाजन यांच्या प्रतिष्ठेची?

'देशात लोकशाही आहे. त्यामुळे मनोज जरांगे Manoj Jarange Patil आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. देशातील मतदार राजा हुशार आहे. विधानसभेला उभे राहिले तर त्यावेळेस लोक ठरवतील. जनता कोणाला पाठिंबा देते हे पाहावे लागेल' असे रावासाहेब दानवे Raosaheb Danve म्हणाले. दानवे आज (रविवारी) विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भाजपने चारशे पारचा नारा दिला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना महायुतीत येण्याचे आवाहन केले. त्यामुळे भाजप 200 पार देखील होत नाही. त्यामुळे पंतप्रधान ठाकरे-पवारांना आमंत्रण देत असल्याची टीका करण्यात येत आहे. विरोधकांच्या या दाव्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पेक्षा अधिक जागा मिळतील यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्रात देखील महायुती 45 पेक्षा जास्त जागा जिंकेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही', असे रावसाहेब दानवे यांनी यांनी ठणकावून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरएसएस आणि भाजप कधीच वेगळं होऊ शकत नाही. आरएसएस आमची मातृ संस्था आहे. राजकारणात आम्हाला सल्ला देतील. पण इंटर फेअर करतील असे मुळीच नाही, असे देखील दानवे यांनी स्पष्ट केले.

रावसाहेब दानवेंचे देवदर्शन

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज (रविवारी) . पंढरपूरला येण्याआधी शनिवारी दानवे यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले होते. जालना लोकसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दानवे यांनी राजूर येथे राजुरेश्वराचे दर्शन घेऊन कामाला सुरूवात केली होती.

Manoj Jarange  Raosaheb Danve
6 Mumbai seats to vote on May 20: मुंबई कुणाची? भाजपला चितपट करण्यासाठी काँग्रेसने ठाकरे सेनेसोबत आखला डाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com