Maratha Kunbi GR news : मराठा अन् कुणबी एकच, सगेसोयरे या दोन GR चे काय झाले? जरांगेंच्या प्रमुख मागण्यांबद्दल विखे पाटलांनी काय सांगितलं?

Political News : शिष्टमंडळाने मराठा आणि कुणबी एकच व सगेसोयरे आदेशाची तत्काळ अंमलबजावणी या दोन मागण्या वगळता इतर सर्व मागण्याबाबत तातडीने जीआर काढण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. सोमवारी दुपारी उपोषणस्थळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह समितीच्या सदस्यांनी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने मराठा आणि कुणबी एकच व सगेसोयरे आदेशाची तत्काळ अंमलबजावणी या दोन मागण्या वगळता इतर सर्व मागण्याबाबत तातडीने जीआर काढण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे. तर दुसरीकडे मराठा आणि कुणबी एकच हा जीआर काढण्यासाठी मंत्री विखे पाटलांनी दोन महिन्याची मुदत जरांगे यांच्याकडे मागितली आहे.

यावेळी राज्य सरकारने हैदराबाद, सातारा संस्थांनच्या गॅझेटची अंमबलजावणी करावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्यांची दखल घेत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने हैदराबाद संस्थानच्या गॅझेटची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले आहे. तसेच जरांगे (Manoj Jarange) यांच्या इतरही काही मागण्या मान्य केल्या आहेत.

Manoj Jarange
Police Notice Manoj Jarange : मोठी बातमी! आझाद मैदान खाली करा, मनोज जरांगेंना पोलिसांची नोटीस

मराठा आणि कुणबी जीआर काढण्यासाठी दोन वेळा महिन्याची वेळ द्यावी, अशी मागणी उपसमितीने केली आहे. त्यानंतर सगेसोयरेबाबत राज्य सरकारकडे एकूण आठ लाख हरकती आल्या आहेत. या सर्व हरकती छाननीसाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे त्याची पडताळणी सुरु आहे. त्यासाठी ही राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वेळ वाढवून मागितली आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange Patil : पोलिसांची नोटीस : जरांगेंनी दाखवली 'टोपली', म्हणाले मेलो तरी सोडत नाही..

मराठा आणि कुणबी एकच, सगेसोयरे बाबतचे आरक्षण या दोन मागण्या सोडून राज्य सरकारने इतर तीन मागण्या राज्य सरकारने मंजूर करीत जीआर काढण्याची तयारी दर्शवली आहे. या मागण्याचा जीआर हातात आल्यानंतर मनोज जरांगे उपोषण मागे घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com