Maharashtra Politics : मनोज जरांगेंच्या विरोधात मराठा मंत्री एकवटले; थेट इशारा, 'खपवून घेणार नाही...'

Manoj Jarange Vs Maratha Ministers : मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सरकार आणि मंत्र्यांवर टीका केली आहे. त्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकी उमटले.
Manoj Jarange Patil amid the ongoing Maratha reservation agitation; his remarks have drawn objections from ministers.
Manoj Jarange Patil amid the ongoing Maratha reservation agitation; his remarks have drawn objections from ministers.sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. काल रात्री त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होते. त्यांनी उपचार देखील घेतले नाहीत. दरम्यान, जरांगे पाटील हे सरकार आणि मंत्र्यांवर टीका करण्यासाठी जी भाषा वापरत आहेत, त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला.

जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा मंत्री आक्रमक झाले. त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जरांगे पाटील हे जी भाषा वापरत आहेत, ती खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. या विषयी 'साम टिव्ही'ने वृत्त दिले आहे.

'साम'ने दिलेल्या वृत्तानुसार गुलाबराव पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, गिरीश महाजन, संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका मांडली.

जरांगे पाटील यांनी सरकावर बोलल्यास खपवून घेतले जाणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी भूमिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आली. तसेच सरकाराला सर्व समाजातील विद्यार्थ्यांना, तरुणांना मदत करायची आहे. मात्र, असेच सुरू राहिले तर सरकारची प्रतिमा नकारात्मक निर्माण होईल, असा सूर देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटला.

Manoj Jarange Patil amid the ongoing Maratha reservation agitation; his remarks have drawn objections from ministers.
Manoj Jarange : उपोषणाचा त्रास होतोय, दौरा रद्द करेल...एकटा थेट मुंबईला जाईल, मनोज जरांगे पाटलांचे मध्यरात्री सुतोवाच

जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली

मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीहून निघण्यापूर्वीच उपचार घेण्यास नकार दिला होता. काल रात्री त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होता. त्यांची प्रकृती खालवली असल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यांनी पाटोदा येथे देखील उपचार घेण्यास नकार दिला. उपोषणामुळे प्रकृती साथ देत नाही आपण दौऱ्या रद्द करून एकटेच मुंबईला जाऊ, असे सुतोवाच देखील त्यांनी केले.

Manoj Jarange Patil amid the ongoing Maratha reservation agitation; his remarks have drawn objections from ministers.
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा निर्धार पक्का! चलो मुंबई, तयारी सुरू; सरकारला घेरण्याची रणनीती ठरली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com