Nagpur News: राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्या. संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला दुसरा अहवाल सोमवारी न्या. शिंदे यांनी विधिमंडळ प्रांगणातील कक्षात राज्य शासनास सादर केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यापूर्वी न्यायमूर्ती शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य सरकरकडे 31 ऑक्टोबर२०२३ ला सादर केला होता.
सोमवारी शिंदे समितीने दुसरा टप्प्यातील अहवाल सादर केला. राज्यभरात यापूर्वी शिंदे समितीने सर्वेक्षण केले होते. राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्या संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला दुसरा अहवाल न्या. शिंदे यांनी आज विधिमंडळ प्रांगणातील कक्षात राज्य शासनास सादर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा अहवाल सुपूर्द करण्यात आला. यावेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सर्वश्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, शंभूराज देसाई उपस्थित होते. यापूर्वी न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल 31 ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी सकल मराठा समाजाची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीला मार्गदर्शन करतांना एका मोठ्या आंदोलनाच्या तयारीला लागा, असे आवाहन उपस्थितांना केले. त्यामुळे त्यानंतर लगेचच सोमवारी शिंदे समितीने दुसरा टप्प्यातील अहवाल सादर केला.
(Edited by Sachin Waghmare)