Ramgiri Maharaj : रामगिरी महाराज विधानावर ठाम; म्हणाले, 'आदर्श चांगले नसतील, तर समाज रसातळाला...'

BJP workers from Shrirampur met Ramgiri Maharaj : सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांची श्रीरामपूरमधील भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांनी भेट घेतली. रामगिरी महाराजांनी आपल्या विधानाचे यावेळी समर्थन केले.
Ramgiri Maharaj 2
Ramgiri Maharaj 2Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मुस्लिमांच्या भावना दुखवल्याच्या विधानावरून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या विधानाविरोधात मुस्लिमांकडून रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त होत असतानाच भाजप आणि हिंदू संघटना त्यांच्या समर्थनात समोर येऊ लागले आहेत.

श्रीरामपूरमधील भाजप आणि हिंदू संघटनेचे कट्टर कार्यकर्त्यांनी महाराजांची सरला बेटावर आज भेट घेतली. या भेटीत रामगिरी महाराजांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगत, समाजातील अनिष्ट प्रथांवर बोलत राहणार, असे सांगितले. तसंच "आदर्श चांगले नसतील, तर समाज केव्हाही रसातळाला जाऊ शकतो. आम्हाला सर्व धर्मांबद्दल आदरच आहे", असं रामगिरी महाराज यांनी म्हटले.

रामगिरी महाराज म्हणाले, "आम्ही जे बोललो त्याला शास्त्राचा आधार आहे. बांगलादेशात जी परिस्थिती झाली, तशी परिस्थिती आपल्याकडे देखील होऊ शकते, याची कल्पना देण्याच्या दृष्टीने आणि झोपलेल्या हिंदू (Hindu) समाजाला जागृत करण्याच्या दृष्टीने, बोलणे गरजेचे आहे. समाजात अनिष्ट प्रथा आहेत, अशा अनिष्ट प्रथांनां मुठमाती द्यावी. आमचे आदर्श कसे असले पाहिजेत, यासंदर्भाने मी भाष्य केले आहे".

Ramgiri Maharaj 2
Ramgiri Maharaj : रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल होताच, इकडं गावकऱ्यांनी घेतला 'हा' पवित्रा...

"आदर्श चांगले नसतील, तर समाज केव्हाही रसातळाला जाऊ शकतो. आम्हाला प्रवचनातून सर्व धर्मांबद्दल आदरच आहे. धर्मग्रंथातील वस्तुस्थिती मी समाजासमोर मांडली हा घटनेने दिलेला अधिकार आहे. हिंदू समाज सहनशील आहे. हिंदुत्वादी संघटनांनी संयमाने, शांततेने कुठलेही गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यावी", असे आवाहन रामगिरी महाराज यांनी केले.

Ramgiri Maharaj 2
Chhagan Bhujbal : नाशिकमधील जरांगे-पाटलांच्या रॅलीतील गर्दीवरून भुजबळांनी डिवचलं; थेट आकडाच सांगितला

भाजप (BJP) ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी देशाच्या सीमांवरील सुरक्षा धोक्यात आहे. त्याचपद्धतीने अंतर्गत सुरक्षाही धोक्यात आहे. त्यादृष्टीने देशाच्या अखंडतेचा अविभाज्य घटक असलेल्या हिंदू समाजाला जागृत करणे गरजेचे आहे. रामगिरी महाराज यांनी प्रवचनात हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी भाष्य केल्याचे सांगितले.

तसंच महंत रामगिरीजी महाराज देशातले पहिले महंत आहेत की ज्यांनी परमार्थाबरोबर हिंदुत्व आणि राष्ट्रवाद मांडला आहे. संपूर्ण हिंदू समाजाने रामगिरी महाराजांचे समर्थन केले पाहिजे. मंहतांनी आपल्या प्रवचनातून केवळ परमार्थ न सांगता हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि देशभक्ती सांगून समाजाचे प्रबोधन केले पाहिजे. आणि देशाची अखंडता टिकवली पाहिजे, असे सांगितले.

श्रीरामपूरमधील मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, शिवसेनेचे प्रशांत लोखंडे, देविदासजी चव्हाण, आध्यात्मिक आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे संयोजक बबन मुठे, उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आसने, नगरसेवक दीपक चव्हाण, संजय यादव यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com