Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत 17 तारखेला महत्वाची बैठक; जरांगे यांचे भुजबळांवर पुन्हा टीकास्त्र

Chhagan Bhujbal : आपल्याला गोळी मारण्याचा डाव असल्याचा आरोप भुजबळांनी केला होता.
Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil and Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्यभर रान उठवलेले मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शरसंधान साधले. भुजळांकडून विधानसभेत जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. भुजबळ हे विश्वासघातकी असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा डाव समजून घ्यावा, असे जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, 17 डिसेंबरला आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेतली जाणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली.

जरांगे यांनी गुरूवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, मराठे ओबीसीमध्ये (OBC) नको असे भुजबळ का म्हणत आहेत. आरक्षणाची (Reservation) शासकीय नोंद सापडल्या आहेत. तुमच्या नोंदी नसताना तुम्हाला आरक्षण मिळाले. विधानसभेत (Assembly) मराठा आरक्षणाच्या बाजूने काही जण बोलले, त्यांचे आभार मानतो. जे बोलत नाहीत, त्यांना मराठे बघत असून त्यांना दारातही उभे करणार नाही. पैसे, दादागिरी कसलीही ताकद दाखवा, आता मराठे मागे फिरणार नाहीत. आमच्या सारथी योजनेलाही भुजबळ विरोध करत आहेत. (Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal)

Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
Ajit Pawar: 'पीएच.डी'वर दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अजितदादा म्हणाले, 'राजकीय नेत्यांवर पीएच.डी करणाऱ्या..'

मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. त्यांनी सुड भावनेने मराठ्यांशी वागू नये. त्यांचे मराठ्यांनी काही त्रास दिला नाही. गर्दीचा उपयोग तुम्ही स्वत:साठी करून घेतला आहे. मी गर्दीचा उपयोग समाजासाठी करत आहे. आज 40 लाख मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले आहे, हा गर्दीचा विजय आहे. मला ओबीसींमधील 47 जातींचे नेते मला भेटायला आले होते. त्यांनाही वेगळे आरक्षण हवे, भुजबळ त्यांना खाऊ देत नाहीत, अशी टीका जरांगे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळ जातीवादी आहेत, अशी निशाणा साधताना जरांगे म्हणाले, त्यांनीच पहिली जातीवादाची भाषा केली. त्यांनी महापुरूषांच्या जाती काढल्या. मराठा समाजाचा रोष आता व्यक्त व्हायला लागला आहे. त्यांनी यापुढे बोलू नये. सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यावर आम्ही ठाम आहे. हे प्रमाणपत्र ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्यावे, कुणालाही जबरदस्ती नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. आम्ही 24 तारखेपर्यंतच वाट बघणार आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शांततेत आंदोलन सुरू करणार आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
Sanjay Raut: 'हे सरकार तकलादू, सुरक्षेच्या नावाने बोंबाबोंब'; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

सरकार भुजबळांचे ऐकत आहे

सरकार भुजबळांचे ऐकून निर्णय घेत आहे. त्यांनी काही सांगितले की, लगेच निर्णय घेतला जातोय. गोरगरिबांच्या आरक्षणाचा विषय ते हाताळत नाहीत. गोरगरीब ओबीसी, वंजारी, माळी, धनगरांना भुजबळ भडकवत आहेत. ते स्वत:साठी गर्दीचा फायदा घेऊन सरकारकडून केस मागे घ्यायला लावत आहेत. भुजबळ मतलबी असून नंतर कुणालाच विचारणार नाही. त्यांनी समोरच्याला बदनाम करून संपविले आहे. मागच्या सगळ्या पक्षांना संपवल्यामुळे यांना संपण्याची वेळ आलीय, म्हणून धडपड सुरू आहे.

Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
Pune News: पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, दिल्ली कनेक्शन; एकाला अटक

दरेकरांना प्रत्युत्तर

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले, हवेवर स्वार होणारा मी नाही, तुम्ही आहेत. बँकेतून काय-काय़ खाल्ले हे धुवून काढण्यासाठी तुम्ही कुठे गेला हे सगळ्यांना माहिती आहे. मी नेता नाही, मी मराठ्यांचा सेवक आहे. मराठ्यांच्या सभा म्हणजे वेदना आहेत. मी त्याच वेदना मांडत आहे. तुम्हाला ते सहन होत नाही. हीच तुमची पोटदुखी आहे. ही गर्दीवर स्वार होण्याची भाषा नाही, ही आमची वेदना आहे.

(Edited By - Rajanand More)

Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
Lok Sabha Security Breach: धमकी खरी ठरवल्यानंतर पन्नूने जाहीर केली संसदेतील घुसखोरांसाठी 10 लाखांची मदत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com