Manoj Jarange Patil News : आरक्षणाची मागणी पूर्ण करणार की नाही? आजच स्पष्ट करा, मनोज जरांगे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

Manoj Jarange Patil urges the Chief Minister to make a decision today on the Maratha reservation issue. Will the community receive reservation or not? छ आज सायंकाळ पर्यंतच मराठा आरक्षण व आमच्या मागण्यांवर निर्णय घेणार की नाही? ते स्पष्ट करा. मराठा समाजाला तुम्ही सुखाने जगू देणार नसला तर आम्हीही तुम्हाला सुखाने सत्ता उपभोगू देणार नाही.
manoj jarange Patil-CM Fadanvis News
manoj jarange Patil-CM Fadanvis NewsSarkarnama
Published on
Updated on

दिलीप दखने

Antarwali Sarati : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. आज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक आवाहन केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर निर्णय घ्यायला दहा दिवस लावू नका, आजच संध्याकाळ पर्यंत निर्णय घ्या अन्यथा आम्हाला उपोषण सोडून दुसरा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिला.

अंतरवाली सराटीत उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्या अनेक आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. स्वत: जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. हळूहळू अंतरवालीत राजकीय नेत्यांच्या भेटीसाठीचे दौरे सुरु झाले आहे. काल जालन्याचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर रात्री उशीरा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच आपल्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांकेड पाठपुरावा करून यावर निर्णय घेऊ, असे धस यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, थोड्या वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या टीका करतांना आज सायंकाळ पर्यंतच मराठा आरक्षण व आमच्या मागण्यांवर निर्णय घेणार की नाही? ते स्पष्ट करा. मराठा समाजाला तुम्ही सुखाने जगू देणार नसला तर आम्हीही तुम्हाला सुखाने सत्ता उपभोगू देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. अंतरवाली सराटीत आनेक लोक उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत खालावत चालली आहे आमच्या आठ नऊ मागण्या आहे ,आरक्षणाचा प्रश्न आहे.

manoj jarange Patil-CM Fadanvis News
Manoj Jarange News : वाल्मिक कराडप्रकरणी मनोज जरांगेंची मोठी मागणी; म्हणाले,'पोलीस अधिकाऱ्याला…'

मुख्यमंत्री फडणवीस यांना आरक्षण द्यायचे का नाही? हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट करावे. देणार नसाल तर आम्हाला उपोषण सोडून वेगळ्या मार्गाने आंदोलन करावे लागेल. आम्हाला परत उपोषण करावे लागेल असे वाटत नव्हते. सरकारने दगा फटका करु नये मी पाच वर्ष सुखाने तुम्हाला सत्ता भोगू देणार नाही. फडणवीस यांना एकच म्हणणं आहे की,आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही ते सांगावं अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल.

manoj jarange Patil-CM Fadanvis News
Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी महाविकास आघाडी कोर्टात गेली, एकनाथ शिंदेंचा घणाघात

आमच्या एकाही बांधवांचा जीव जायला नको, पण मुख्यमंत्री उलट्या काळजाचा आहेत की काय? मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही? दहा दिवसात सांगण्यापेक्षा संध्याकाळपर्यंत सांगून टाका, म्हणजे उपोषण सोडून देऊन दुसरा मार्ग स्वीकारता येईल, असेही जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान ,मंगळवारी रात्री उशिरा आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपचार घेण्याची विनंती केली.

manoj jarange Patil-CM Fadanvis News
Manoj Jarange Patil : आमच्या हक्काचे ओबीसीतून आरक्षण द्या, न मागितलेले दहा टक्के आमच्या माथी का मारता?

रात्री उशिरा जरांगे यांना सलाईन लावण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांनी सांगितले. मराठा आरक्षणा बाबत ज्या मागण्या आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करणार आहे. यातून नक्कीच मार्ग निघेल,असे धस यांनी म्हटले आहे. दरम्यान,चार दिवसात 15 उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली असल्याने त्यांना अंबड येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com