
Jalna News : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी, एसआयटीकडून सुरु आहे. त्यामध्ये दिवसागणीस मोठे खुलासे होत असतानाच या प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराडला पोलीस यंत्रणेकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे यावरून पोलीस यंत्रणेवर आरोप होत असतानाच मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, रविवारी त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करतानाच वाल्मिक कराडवर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सगळया आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून राज्य सरकारला सत्ताधारी व विरोधकांकडून घेरले जात आहे. त्यातच आता मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
वाल्मिक कराडसंदर्भात प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी मोठी मागणी केली आहे. हत्याप्रकरणातील सगळया आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. सगळ्यांकडे भरपूर माहिती आहे, या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांस सह आरोपी करा, सरकारी डॉक्टरची देखील चौकशी करा. कराड याचे काहीही दुखत नसताना देखील त्याचे डॉक्टर त्याचं दुखत असल्याचे सांगत आहेत. त्यांची चौकशी करा? वाल्मीकला गुन्ह्यातून सोडण्यासाठी डॉक्टर आणि पोलीसांनी (Police) हे षडयंत्र केलं आहे का? असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
वाल्मिक कराडला काहीही झालेले नाही, सत्तेचा वापर करून अधिकारी पाठवले जात आहेत. षडयंत्र सुरू आहे, दवाखान्यात नेऊन सोडण्याचे ऑपरेशन सुरू आहे. आता सरकारने एक काम करावे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर काढावेत, त्याच्या ड्रायव्हरचे सीडीआर काढा. तो दुसऱ्यांच्या फोनवरून बोलतो, गेवराई पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला चादरी नेऊन दिल्या. त्यांचीही चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.