

सीजेपीच्या अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी(ता.16 ऑक्टोबर) दिल्लीमध्ये तिरंगा मोर्चाचं आयोजन केलं आहे. देशभरातील नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहनही दीपके यांनी केलं आहे. हा तिरंगा मोर्चा सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ हा तिरंगा मार्च काढला जाणार आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क येथे सायंकाळी ५ वाजता हा मोर्चा काढला जाईल.
राज्यात दुष्काळाची तीव्रता भयंकर आहे. सरकारकडून राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत थेट बँक खात्यात जमा होणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, याच मदतीवरून शेतकरी संघटना आणि विरोधक संतापले आहेत. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर चक्क 5000 रुपयांच्या नोटांची उधळण केल्याचा प्रकारही पाहायला मिळालं.
नवीन नांदेड : विविध भाषांमधील लेखनसंहिता अन्य भाषांमध्ये सहजपणे भाषांतरित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या ‘हँडहेल्ड स्क्रिप्ट ट्रान्सलेशन डिव्हाइस’साठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सहा प्राध्यापकांना पेटंट प्राप्त झाले आहे. भाषा, संगणकशास्त्र, शिक्षणशास्त्र आणि समाजशास्त्र या विविध ज्ञानशाखांतील प्राध्यापकांनी एकत्र येऊन ही संकल्पना साकारली आहे.
राज्य सरकारने आज राज्यातील ४० तालुक्यांचा नव्याने समावेश दुष्काळग्रस्त तालुके म्हणून केला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे पण मुळशी तालुक्याला मात्र वगळण्यात आलं आहे. यामुळं तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून वारंवार मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आणखी सहा महिने पुढे ढकलण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आगामी निवडणुकीसाठी जुने ३१७६ एवढे असलेले तालुक्यातील सर्व मतदार बाद ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. आधीच ७७९ ग्रामपंचायत सदस्यांसाठीचा न्यायालयीन लढा लढून त्यांचे मतदान पुन्हा पात्र ठरविण्यात आले असताना जिल्हा उपनिबंधकांनी १५ दिवसांपूर्वी यातीलच ७१२ मतदार बाद ठरविले होते. या पार्श्वभूमिवर आता बाजार समिती निवडणूकच शासन सहा महिने पुढे ढकलत आहे.
केंद्र सरकारने पुण्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयात एमबीबीएसच्या ५० जागा असतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठच्या चर्चित निळ्या ड्रम हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने आरोपी मुस्कान आणि साहिल यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून सरकारचे प्रमुख या नात्याने सलग २५ वर्षे जनसेवा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठराव महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
बीडमधील दिंद्रुड येथील रुग्णवाहिका नाकारल्याप्रकरणी कडक कारवाई करणार असल्याचे संकेत मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले आहेत. माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे पैसे नसल्याच्या कारणावरून एका कुटुंबाला रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. ‘पैसे नाहीत तर चार-चार लेकरं कशाला पैदा करता?’ असे संतापजनक वक्तव्य करत रुग्णवाहिका नाकारल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेची संपूर्ण माहिती घेतली असून, हा प्रकार चुकीचा असल्याचे स्पष्ट करत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले. दुष्काळाच्या परिस्थितीत प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने वागणे गरजेचे आहे. हा दुष्काळ सर्वांनाच हाताळावा लागणार असून, सर्व यंत्रणांनी जनतेप्रती संवेदनशील राहून काम केले पाहिजे, असेही बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.
जालन्यात भजनाच्या कार्यक्रमात भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आली असून हा कार्यक्रम मंगळवारी (ता.13) रात्री शहरातील मंमादेवी मंदिर परिसरात झाला. भाजपचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी रात्री शहरातील मंमादेवीच्या भजन कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून ठेका धरला. दरम्यान भजन कार्यक्रमाच्या अगोदर देवाकडे शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केली, भजनामध्ये माणूस मंत्रमुग्ध होतो, तेव्हा कोण काय करतो हे माहिती पडत नाही, असे स्पष्टीकरण भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी दिलं आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील शाही विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा यंदा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या परिस्थितीचे भान राखत जलमंदिर पॅलेस येथील शाही सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे.
संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे अधिकृत उमेदवार बालाजी पाटील चाकूरकर यांनी थेट आव्हान दिले आहे. “१८ वर्षांत सभागृहात एक प्रश्न उपस्थित केल्याचा व्हिडिओ दाखवा, मी माझी उमेदवारी मागे घेतो,” असे खुले आव्हान बालाजी पाटील चाकूरकर यांनी आमदार सतीश चव्हाण यांना दिले आहे. या आव्हानामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वडनेर येथील विश्वगंगा हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास एका ट्रॅव्हल्स मधून जेवणासाठी थांबून जेवण केले, दोनजण मद्यपान केलेले अवस्थेत होते व त्यांनी बिलावरून वाद घातला व आपण एफएसएचे कर्मचारी असल्याचे सांगून हॉटेलचे लायसन्स जप्त करून हॉटेल बंद पाडण्याची धमकी दिली. तसेच हॉटेल बाहेर मालकाला बोलावून 50 हजार रुपयांची मागणी केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून हॉटेल चालक पवन भालेराव यांनी सरळ तुकाराम मुंढे यांना आवाहन केले आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांची अधिकृत ओळख पटवावी आणि आरोप सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
राज्यात दुष्काळी स्थिती असून शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच आता सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे पिक पाहणीसाठी पैसे मागितल्याने महसूल सहायकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हणमंत सुरेश जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या महसूल सेवकाचे नाव असून या संदर्भात शेतकऱ्यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे तक्रार केली होती. आमदारांनी याची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या होत्या.
लातूर येथील आरोग्य उपसंचालक पदावर असलेल्या डॉक्टर रेखा गायकवाड यांना अखेर निलंबित करण्यात आल आहे, डॉक्टर रेखा गायकवाड कार्यकाळातील कामांची चौकशीचे आदेश राज्याच्या शहरी आरोग्यसेवा चे आयुक्त तथा राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियानाचे संचालक डॉक्टर सुनील भोकरे यांनी दिले होते दोन वेळा ही चौकशी समिती देखील बदलण्यात आली मात्र अखेर डॉक्टर रेखा गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार, माजी आमदार सर्वांची बैठक शिंदेंसाहेबांनी नंदनवन येथे घेतली. बैठकीत पक्षाची चर्चा झाली की येणाऱ्या निवडणुकीत कसं काम करायचे. चर्चेमध्ये शिक्षक मतदारसंघाबाबत नाव येत होती. मात्र, शिदेंसाहेबांनी सर्व माहिती घेतली. अंतिम निर्णय तेच घेतील, असे देखील धंगेकर यांनी सांगितले. सानप काल नंदनवनला होते मात्र ते बैठकीत नव्हते, असे देखील त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. "समान नागरी कायद्याला विरोध केलात तर तुम्हाला खलास करू," असे या पत्रात म्हटले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांना ‘सेंट्रल किचन’द्वारे पुरविण्यात येणाऱ्या भोजनाची गुणवत्ता व कामकाजाच्या तपासणीसाठी शासनाने नऊ सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीला 30 ऑक्टोबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे
‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’तर्फे (एनटीए) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘यूजीसी-नेट डिसेंबर 2026 परीक्षे’साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेचे आयोजन येत्या 14 ते 19 डिसेंबरदरम्यान राष्ट्रीय पातळीवर केले जाणार आहे. पात्रताधारक उमेदवारांना परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 28 ऑक्टोबरपर्यंत मुदत असेल. नियमित शुल्क भरण्यासाठीदेखील हीच मुदत लागू राहणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 29 ते 31 ऑक्टोबर अशी असेल.
नवी मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका ट्रकमधून 1.15 कोटी रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त केले असून, ट्रकचालकाला अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. भरारी पथकाने ट्रक अडवून तपासणी केली. या ट्रकमध्ये शुल्क न भरता वाहतूक केले जात असलेले मद्य आढळले. हे मद्य केवळ गोव्यात विक्रीसाठी तयार केले असल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रवीण तांबे यांनी सांगितले.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे 46वे राज्यस्तरीय अधिवेशन 19 ऑक्टोबरला नागपूर येथे आयोजित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून, शिक्षणमंत्री दादा भुसे उपस्थित राहतील. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा इंगळेंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनात पदोन्नतीतील आरक्षण, अनुशेष, जुनी पेन्शन योजना आदी प्रलंबित मागण्यांवर अधिवेशनात भर दिला जाईल. यावेळी महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात येतील.
भारत आणि अमेरिका संरक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्यासह विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवत असून, दोन्ही देशांतील गुंतवणूक आणि संयुक्त उपक्रमांमुळे मोठ्या संधी निर्माण होत आहेत, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितले. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जोधपूर येथे झालेल्या ‘तरंग शक्ती’ लष्करी सरावाचा उल्लेख करत त्यांनी संरक्षण सहकार्य अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गेल्या आठवड्यात चर्चा झाल्याचेही गोर यांनी नमूद केले.
बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे दुर्गापूजेच्या दोन मंडपांना आग लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. भुलाहीपूर परिसरात ही घटना घडली. काही समाजकंटकांनी आग लावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रण तपासले जात असून आयोजकांकडूनही माहिती घेतली जात आहे. प्राथमिक तपासात धार्मिक तेढ नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
भारत आणि अमेरिका संरक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्यासह विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवत असून, दोन्ही देशांतील गुंतवणूक आणि संयुक्त उपक्रमांमुळे मोठ्या संधी निर्माण होत आहेत, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितले. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जोधपूर येथे झालेल्या ‘तरंग शक्ती’ लष्करी सरावाचा उल्लेख करत त्यांनी संरक्षण सहकार्य अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गेल्या आठवड्यात चर्चा झाल्याचेही गोर यांनी नमूद केले.
उत्तर प्रदेशातील काही मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांकडून निवडणुकीची उमेदवारी विकली जात असल्याच्या आरोपांशी संबंधित स्टिंग ऑपरेशनची ‘सीबीआय’ चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्या स्वराज वाहिनी असोसिएशनला या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असलेले निवेदन व स्मरणपत्र पुन्हा सादर करण्याची मुभा दिली. आयोग तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास न्यायालयाने व्यक्त केला.
हिमाचल प्रदेशात 2027मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) तयारी सुरू केली असून, भाजप आणि काँग्रेसला पर्याय देण्याचे उद्दिष्ट असल्याचे पक्षाचे राज्य प्रभारी ऋतुराज झा यांनी सांगितले. सिमल्यातील पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल 15 नोव्हेंबरच्या दरम्यान सिमल्याला भेट देणार असून, त्यावेळी सात ते आठ नेते पक्षात प्रवेश करतील, असे त्यांनी सांगितले.
रेल्वेच्या मालवाहतुकीत सप्टेंबरमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 6.14 टक्के वाढ झाली. या महिन्यात 13.535 कोटी टन मालाची वाहतूक करण्यात आली. सप्टेंबर 2025 मध्ये हे प्रमाण 12.752 दशलक्ष टन होते. अन्नधान्य वाहतुकीत 25 टक्के, कोळशात नऊ टक्के आणि पोलाद वाहतुकीत 5.5 टक्के वाढ नोंदवली गेली. मालवाहतुकीतून मिळणारा महसूलही 9.3 टक्क्यांनी वाढला.
नवरात्रीनिमित्त जयपूरमधील विविध गरबा मंडपांबाहेर हिंदू नसलेल्यांना प्रवेश बंद असल्याचे फलक सनातन सुरक्षा दल या हिंदुत्ववादी संघटनेने लावले आहेत. उत्सवावर लक्ष ठेवण्यासाठी 27 पथके तैनात केल्याचे संघटनेचे संस्थापक रवी गौतम यांनी सांगितले. गरबा आयोजकांनी सहभागींची ओळखपत्रे तपासावीत, तसेच त्यांच्या कपाळावर टिळा लावून मनगटावर कलावा (धागा) बांधण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.