

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणुकीच्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो वापरण्यावर माजी खासदार विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्हाचा वापर तातडीनं थांबवा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा थेट इशाराच राऊतांनी दिला आहे.
खासदार सुनिल तटकरेंनी यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या अर्थ खात्याच्या कारभारावरुन अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते म्हणाले, अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी शिस्तीनं अर्थ खात सांभाळलं, आपत्ती काळात तातडीनं आर्थिक मदत केल्याचा मुद्दा मांडला. शेतकऱ्याला अग्रीम मदत अपुरी असल्याचंही म्हटलं. तसेच आपण शेतकऱ्यांच्या वाढीव मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती तटकरेंनी दिली आहे.
ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन फक्त ब्लड बॅंकाच करू शकतात. सामाजिक संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करू शकत नाहीत. एखादी सामाजिक संस्था ब्लड बॅंकेसोबत रक्तदान शिबिराचे आयोजन करू शकते, असे एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
सांगलीतील सोनहिरा साखर कारखान्याचा गाळप हंगाम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. कारखान्याच्या काटा गेटवर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना पैसे दिले तरी चारा कुठून आणणार, असा सवाल उपस्थित करत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी थेट आर्थिक मदत देण्यास विरोध दर्शविला आहे. चारा डेपो उभारून शेतकऱ्यांना जागेवर चार दिला तर चांगलं होईल. २०१६ मध्ये उभारण्यात आलेल्या चारा डेपोत झालेल्या चुका टाळाव्यात, असेही मंत्री पाटील यांनी म्हटले आहे.
दिल्लीत उद्या कॉक्रोच जनता पार्टीचा तिरंगा मोर्चा होणार आहे. दिल्लीतील कॉनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क येथे हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा रद्द करण्या यावा, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने मोर्चा रद्द करण्यास नकार दिला आहे.
दुष्काळावर उपाययोजनांसाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक कृती आराखडा तयार केला आहे. या आरखड्यानुसार ते आपल्या मतदारसंघात दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणार आहेत.
अत्यंत चुरशीने सुरू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. तब्बल ५४१८ संस्था सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राजर्षी शाहू समविचारी आघाडी आणि छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी या आघाडीच्या माध्यमातून निवडणुक अत्यंत शिगेला पोचली आहे. बारा तालुक्यातून होणाऱ्या निवडणुकीत करवीर, राधानगरी, पन्हाळा, आणि कागल हे चार प्रमुख तालुके महायुतीचे विजयाचे टर्निंग पॉईंट ठरणार आहेत. तब्बल 12 ते 13 विद्यमान संचालक महायुतीमध्ये असल्याने महायुतीकडे पारडे झुकले आहे. आजही चौदाशे सभासदांसंदर्भात महायुतीकडून त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. त्यांची धास्ती आजही महायुतीला आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य असलेल्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेच्या विरोधात दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सीजेपीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला नेहा बोरा, अभिजीत दिपके यांची देखील उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. पत्रकार परिषद बंद करा, बंद करा अशी यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यामुळे काही वेळ वातावरण तापले होते.
मुळशी तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातही चित्र काही वेगळे नाही. यावर्षी पाऊस कमी झाल्याने येथे पाण्याची उपलब्धता कमी आहे. तसेच शेतीक्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. परंतु तरीही पुणे जिल्हयातील मुळशी तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्याच्या यादीत झाला नाही.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाविषयी काल संजय शिरसाठ यांच्या भावना ऐकल्या, अमरावती मतदारसंघाबाबत आम्ही आमदार संजय खोरके यांच्याशी बोललो आणि आमदार संजय खोरके यांना सूचना देखील दिल्या आहेत. त्यांनी जाऊन अमरावती पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सरनाईक त्यांची भेट घ्यावी, असे सांगितले आहे. तसेच काही समज गैरसमज असेल तर ते आम्ही दूर करू आणि आवश्यकता लागली तर उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवारही बोलतील. मी देखील एकनाथ शिंदे यांच्याजवळ बोलेल आणि अमरावती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणाने महायुतीचे काम करेल. तसेच राज्यातल्या इतर ठिकाणीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीचा धर्म पाळेल अशा प्रकारची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. ते लातूर येथे बोलत होते.
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रिये विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इंडिया आघाडीतील नेत्यांनी ही याचिका दाखल केली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना नोटीस पाठवली आहे.
एसटी खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठका होऊन झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी परिवहन मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. भत्ता लागू करण्यासंदर्भात तीन महिने उलटून देखील भत्ता दिला जात नाही, असा देखील आरोप एसटी महामंडळावर पडळकर यांनी केला आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात कर्मचारी संघटनेकडून संप पुकारण्यात आला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही पडळकरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जळगावच्या बोदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला असून या निवडणुकीत खडसेंच्या हातातून सत्ता गेली आहे. खडसेंचे १७ संचालक असताना देखील भाजपने येथे बाजी मारत जयपाल बोदडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचा एकमेव संचालकाची अशी निवड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अनुषंगाने अमरावती जिल्हा बँकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम २१ सप्टेंबरपासून सुरू होता. या यादीवर १०१ आक्षेप, हरकती दाखल झाल्या. सुनावणीअंती बुधवार १४ ऑक्टोबर रोजी २८५२ मतदारांची अंतिम यादी विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी प्रसिद्ध केली. त्यामुळे ऑक्टोबरनंतर २६ या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे १,१३२ सभासदांना वगळून २,८२५ मतदारांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान काही आक्षेप मान्य करण्यात आले. यानंतर १४ ऑक्टोबर रोजी विभागीय सहनिबंधक जिल्हा उपनिबंधक तसेच जिल्हा बँकेच्या कार्यालयात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने सहकार क्षेत्रात लगबग वाढली आहे.
सांगली मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांचा अर्ज अवैध ठरला होता. याबाबत कोल्हापूर खंडपीठाने आदेश दिला होता. आता या आदेशाला आव्हान देणारी याचिका पडळकर सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहेत. याबाबत उद्या सुनावणी होणार असून माझा अर्ज बाद झाल्याने अनेकांना खुशी झाली होती असे म्हणत पडळकरांनी अप्रत्यक्ष जयंत पाटलांना टोला लगावला आहे.
बँकेत ठेवलेले पैसे ताबडतोब काढून घ्या; ऑक्टोबरनंतर बँका बुडायला लागतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. इराण समर्थन मोर्चादरम्यान त्यांनी केलेल्या या दाव्याकडे माध्यमांनी गांभीर्याने पाहिले नव्हते. मात्र, आता आयडीबीआय बँकेच्या विक्रीच्या निर्णयामुळे बाळासाहेब आंबेडकर यांचा इशारा खरा ठरला असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.
राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळा चार-पाच वर्ष पुढे ढकलावा. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी असलेला 35 हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने राज्यातील दुष्काळ निवारणासाठी वापरावा, शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
उत्तराखंडमधल्या हत्या झालेल्या अंकिता भंडारीच्या पालकांनी इंडिया गेटपुढे आंदोलन केलं. आज पहाटे भंडारी दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि दीड तासाने त्यांची सुटका केली. अंकिता हत्या प्रकरणातील व्हीआयपी आरोपीला राज्यपालपद दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलेलं. तर या घटनेनंतर हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत लज्जास्पद आहे असं ट्विट अभिजीत दिपकेंनी केले आहे.
प्रलंबित आर्थिक मागण्या मान्य न झाल्यास संपाचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. सहा नोव्हेंबरपासून संपावर जाऊ असे त्यांनी म्हटले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
अभिनेता आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावत देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या एका निदर्शनात इम्रान खान सहभागी झाला होता.
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसाय, अहिल्यानगरमधील माजी महापौर संदीप कोतकर आणि ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्याशी संबंधित ‘संदीप उद्योग समूहा’वर आयकर विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांमधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर सर्व प्रकारचा सुका व ओला चारा, तसेच कडबा, कुट्टी आणि पेंढा यांसारख्या चारा प्रकारांची वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रिये विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इंडिया आघाडीतील नेत्यांनी ही याचिका दाखल केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.