Maharashtra Politics Live Update : CJP चे प्रमुख अभिजीत दीपके आंदोलनावर ठाम, पोलिसांनी परवानगी नाकारली, शिवाजी पार्कवर कडेकोट बंदोबस्त तैनात

Political Breaking Live Headlines Updates : CJP चे आज मुंबईत आंदोलन, पोलिसांनी परवानगी नाकारली, उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली, यासह आज दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Live-Update-2
Live-Update-2Sarkarnama

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

ट्रक आणि पिकअप बोलेरोची धडक होऊन 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 25 जण जखमी आहेत. हा भीषण अपघात समृद्धी महामार्गावर धामणगाव रेल्वे जवळ झाला .गावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जात असताना हा अपघात घडला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

भाजपची कोंडी, शिवसेनेची बाजी; शिवसेनेचे पाच तर भाजपचे अवघे दोन स्वीकृत सदस्य नियुक्त

दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने भाजपची कोंडी, ऐनवेळी नव्या नावांची शिफारस, त्यावर शिवसेनेचा जोरदार आक्षेप आणि सभागृहात रंगलेले राजकीय नाट्य.....या सर्व घडामोडींनंतर उल्हासनगर महापालिकेच्या सात स्वीकृत नगरसेवकांची निवड अखेर बिनविरोध झाली. राजकीय संख्याबळाच्या खेळात शिवसेनेने पाच जागा मिळवल्या, तर भाजपच्या वाट्याला दोन जागा आल्या.

शिवाजी पार्कवर कडेकोट बंदोबस्त तैनात

सीजेपी आज शिवाजीपार्कवर आंदोलन करणार आहे. मात्र, आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, अभिजीत दिपके आंदोलनावर ठाम असल्याने परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नियमित पोलिसांसह साध्या गणवेशातील फौजफाटा आणि दादर स्थानक परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com