Maharashtra Political Live Updates : शिवसेना आणि संघाची विचारधारा एकच - एकनाथ शिंदे

Sarkarnama breaking Updates : आज रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजीच्या राज्यभरातील विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Updates
Maharashtra Live Updatessarkarnama

भाजपच्या बॅनरमधून शिंदेंना डिवचले

कल्याण डोंबिवलीमध्ये लावलेल्या बॅनरवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा फोटो आणि त्यावर लावण्यात असलेल्या मजकुराने शिंदेंना डिवचल्याची चर्चा आहे. या बॅनरवर ''इस बार जवाब ही ऐसा देंगे, फिर कभी सवाल ही नही उठेगा...'' असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेतील युती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान नाही

राज्यात आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप- एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार हे निश्चित झाली आहे. मात्र. या युतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान मिळणार नल्याची चर्चा आहे. भाजपच्या काही प्रभावी नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्याचा आग्रह धरल्याची माहिती आहे.

धर्माधारित राजकारणामुळे भारताने मित्र गमवले - प्रकाश आंबेडकर

केंद्र सरकारच्या परराष्ट्रनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “विश्वास ठेवायचा तर मी लष्कर प्रमुखांवरच ठेवेन, धर्माधारित राजकारणामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरची मित्रता कमी होत आहे.

रेशीमबाग येथे आल्यावर नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते - एकनाथ शिंदे

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाला भेट दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी संघाच्या कार्याचं कौतुक केलं. 'नागपूर ही केवळ राज्याची उपराजधानी नसून संघाची जन्मभूमी आहे. तसंच, शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची विचारधारा एकच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. संघाच्या शताब्दी वर्षाचा उल्लेख करत, त्यांनी स्वयंसेवकांच्या निरपेक्ष सेवेचा गौरव केला. रेशीमबाग येथे आल्यावर नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी आरोपींचं समर्थन करणाऱ्यांवर कारवाई करावी : धनंजय देशमुख

आरोपीचा समर्थन करणारी टोळी सक्रिय झाली असून वारंवार सोशल मीडियावर बोलताना आरोपीची आठवण येत आहे. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात दाखल होणार 150 EV एसटी बस

बुलढाण्यातील 7 आगारांसाठी विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांकडून 150 EV एसटी बसची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात या आठवड्यात 12 बस दाखल होणार आहेत, तर काही दिवसात उर्वरित बस देखील टप्प्या टप्प्याने आणल्या जाणार आहेत.

मोफत शिक्षण कायद्याचं उल्लंघन केल्या प्रकरणी मुंबईतील दोन शाळांची मान्यता रद्द

शिक्षण विभागाने श्रीमती मनरादेवी एज्युकेशन संस्था आझादवाडी, दामू नगर, कांदिवली पूर्व मुंबई, तर हनुमंत विद्यामंदिर शाळा कावरपाडा सातीवली पूर्व केंद्र, वालीव तालुका वसई, जिल्हा पालघर इंग्रजी माध्यम आणि हिंदी माध्यम या दोन शाळांची मान्यता रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. मोफत शिक्षण कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे या शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे - विजय वडेट्टीवार

विधानसभेतील अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे आहे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला व बालकांवरील वाढते अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

महाराष्ट्र सरकारने मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांनी मोठेपणा दाखवत विरोधी पक्षाला स्थान दिले पाहिजे. विरोधी नेते पदाला एक पद मिळते त्यांना कॅबिनेटच्या दर्जा मिळतो. त्यांना एक कार्यालय मिळतो, मात्र ते देण्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष असेल किंवा सभापती असेल यांच्या मागे त्यांनी लपू नये हा सर्व अधिकार त्यांचा आहे. त्यामुळे त्यांनी बाकी काही नाटक करू नका तुम्हाला जर करायचे असेल तर लगेच करून टाका किंवा नसेल करायचे तर तसे सांगून टाका, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला

ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर रात्री अज्ञातांनी गडफेक केल्याचं समोर आलं आहे. दोन महिन्यांपूर्वी पवन करवर याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची माहिती घेण्याकरता ससाणे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आले होते. त्यानंतरते धारूरकडे जात असताना त्यांच्या गाडीवर दगड फेक करत हल्ला करण्यात आला.

देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीला फाशी दिली - हर्षवर्धन सपकाळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीला फाशी दिली. हे अधिवेशन म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com