Maharashtra Politics Live Update : निवडणुकीच्या आदल्या दिवशी गाजर दाखवून निवडणूक जिंकल्या जातात - खासदार विशाल पाटील

Marathi Politics Headlines Updates: आज बुधवार, दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजीच्या देशासह महाराष्ट्रातील राजकीय बातम्या, तसंच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अपडेट्स जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

निवडणुकीच्या आदल्या दिवशी गाजर दाखवून निवडणूक जिंकल्या जातात - खासदार विशाल पाटील

बिहारचा निवडणुकीचा निकाल बघितला तर लोकांची फसवणूक करून, निवडणुकीच्या आदल्या दिवशी गाजर दाखवून निवडणूक जिंकल्या जातात हे दुर्दैव आहे. लोकांनी मात्र आपलं कोण आपल्या अडचणीला कोण समजून घेतंय हे ओळखणे गरजेचे आहे, असं म्हणत खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर टीका केली.

वंचितचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सहा नगरसेवकांचे अर्ज बाद

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरपालिकेत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला. वंचितचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह ६ नगरसेवकांचे अर्ज छाननीत बाद ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता या उमेदवारांना निवडणूक लढण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) अध्यक्षपदी पहिल्यांदाच सनदी अधिकाऱ्याची (IAS) नियुक्ती करण्यात आली आहे. यशदा येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले सनदी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Beed Politics : बीडमध्ये MIM आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये काल रात्री जोरदा राडा झाला. उमेदवारी अर्जाची छाननी होती. यावेळी रात्री उशिरा भाजपा नेते योगेश क्षीरसागर नगरपालिकेबाहेर आले असता त्यांच्यासमोरच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्याला भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे एमआयएम आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.

Pune: पुणे महापालिकेतील दोन अभियंत्यांचे निलंबन

पुण्यातील वारजे येथे निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केल्याचे नागरिकांनी समोर आणून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी ठेकेदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावत पथ विभागाच्या दोन अभियंत्यांवर त्यांनी त्यांच्या कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com