Maharashtra Politics Updates : कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच भाजपचा उमेदवाराची बिनविरोध निवड

Maharashtra Breaking News Today : पुणे महापालिका निवडणुकीत १६५ जागांसाठी ३ हजार ४१ अर्ज दाखल, यासह आज 31 डिसेंबर 2025 रोजीच्या राज्यभरातील राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

RPI चे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे कारागृहातून निवडणूक लढवणार

नाशिकच्या सातपूरमधील पबमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेले RPI आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना आपले प्राधिकृत देण्यात आलेल्या व्यक्तिमार्फत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता लोंढे कारागृहातूनच निवडणूक लढवणार आहेत.

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात शिंदेंच्या शिवसेनेकडून 3 माजी महापौरांसह 99 जणांना उमेदवारी

छत्रपती संभाजीनगरात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती तुटल्यानंतर शिंदेसेनेने तब्बल 99 उमेदवारांना पक्षाचे बी फॉर्म वाटले. यामध्ये तीन माजी महापौर आणि समावेश आहे.

Kalyan Dombivli Mahapalika Election : कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच भाजपचा उमेदवाराची बिनविरोध निवड

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपच्या प्रभाग क्रमांक 18 अ मधील उमेदवार रेखा राजन चौधरी या विजयी झाल्यात जमा आहेत. कारण या जागेसाठी केवळ रेखा चौधरी यांनीच अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात इथे दुसऱ्या एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसल्याने आता रेखा चौधरी यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे निकालाआधीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे.

31st December: 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लष्कर आणि डेक्कन भागातील वाहतुकीत बदल केला आहे. तसंच मद्यपी चालकांविरोधात कारवाई देखील केली जाणार आहे. आज महात्मा गांधी रस्ता आणि जंगली महाराज रस्ता संध्याकाळी ५ नंतर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. एफ सी रोडवर रात्री तरुणाईची मोठी गर्दी होते त्यासाठी वाहतूक पोलीस विभागाने निर्णय घेतला आहे.

PMC Election: पुणे महापालिका निवडणुकीत १६५ जागांसाठी ३ हजार ४१ अर्ज दाखल

पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी २ हजार २९८ अर्ज दाखल झाले. तर, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत १६५ जागांसाठी ३ हजार ४१ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.रात्री उशिरापर्यंत दाखल झालेल्या अर्जाची माहिती नोंदविण्याचे काम सुरू होते. या अर्जाची छानणी आज ३१ डिसेंबरला होणार आहे.मंगळवारी एका दिवसात सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण २ हजार २९८ अर्ज आले. ४१ प्रभागातील १६५ जागांसाठी ३ हजार ४१ अर्ज दाखल झाले.

Kalyan Dombivli Mahapalika Election : महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपचा उमेदवार विजयी

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच प्रभाग क्रमांक 18 अ मधून भाजपने आपले विजयाचे खाते उघडले आहे. 18 अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी केवळ भाजपच्या रेखा राजन चौधरी यांनी अर्ज दाखल केला होता, या जागेसाठी इतर कुणीही अर्ज दाखल केला नसल्याने. निकालाआधीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com