

धुळ्यातील शिख समाज बांधवांचे धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन...
महिलांचं मोठ्या प्रमाणात शीख समाज बांधव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून...
धुळे गुरुद्वाराला कुलूप लावल्याच्या मुद्द्यावरून शिख समाज बांधव संतप्त...
धुळे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धिरजसिंग खालसा यांची गुरुद्वारात झाली होती हत्या...
मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार असून प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डिल झाल्याचा सुजात आंबेडकरांनी केला दावा
मनसेच्या बोरिवली पूर्व येथील शाखेत उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना. शिंदेंच्या सेनेची प्रचार रॅली आल्याने दोन्ही कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा. उद्धव ठाकरे गाडीत जात असताना मनसे, ठाकरेंची सेना विरुद्ध भाजपा आणि शिंदेंची सेना यांच्या कार्यकर्त्यांनी दिला घोषणा
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठी शिस्तभंगाची कारवाई केली असून 22 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली आहे. या सर्वांवर बंडखोरी, अपक्ष उमेदवारी व पक्षविरोधी वक्तव्यांचा ठपका ठेवण्यात आला असून भविष्यातही कठोर कारवाईचा इशारा भाजपने दिला आहे.
निवडणुकीत महायुतीचे ६८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यावर विरोधकांनी टीका केली असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी, जनतेचा कौल हाच कोणत्याही न्यायालयापेक्षा सर्वोच्च असून विरोधक खुशाल कोर्टात जाऊ शकतात. पण आम्हाला जनतेच्या न्यायालयाने निवडून दिल्याचा टोला लगावला आहे.
मुंबई मराठी माणसांनी लढून मिळवली आहे. तर भाजपकडून मराठी-अमराठी असा वाद केला जात आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कांदवली भागातील शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या. यावेळी ते बोलत होते.
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला एकूण 62 जागा दिल्या होत्या, त्यापैकी ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीने 16 जागांवर उमेदवारच उभा केला नाही. यावर प्रतिक्रिया देताना सुजात आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. मुंबईत वंचितने 16 जागी उमेदवारी दिली नाही कारण, काँग्रेसने हेकेखोरपणा केल्याचे त्यांनी म्हटलं आहे. कारण आम्हाला ज्या 16 जागा हव्या होत्या त्या काँग्रेसने आम्हाला दिल्या नाहीत, काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या घरात 6 ते 7 जणांना उमेदवारी द्यायची होती, त्यामुळे हा प्रकार घडला, त्यामुळे आम्ही देखील 16 जागांवर उमेदवारी दिले नाहीत असे सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
राज आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईपाठोपाठ ठाणे महापालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुंबईत शब्द ठाकरेंचा, मुंबईची प्रगती-मुंबईकरांचा स्वाभिमान’ अशी टॅगलाईन आहे, तर ठाण्यात ‘आम्ही वचनबद्ध आहोत’ अशी टॅगलाईन आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा संयुक्त जाहीरनामा जाहीर करण्यात आल्या आहेत. ठाकरे बंधू यांच्या वचनाम्यावर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली आहे. ठाकरे बंधूंचा जाहीरनामा नव्हे तर चोरीनामा आहे. मुंबईचे रखडलेले प्रकल्प, भ्रष्टाचार आणि गचाळ कारभार याला फक्त उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोपही वाघ यांनी केला आहे.
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होत आहे. त्या संमेलनात बोलताना स्वागताध्यक्ष तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आगामी नाट्यसंमेलनही सातारा येथे घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
सादीक कपूर यांच्या आत्महत्येप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार फारूख इनामदार यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. डीसीपी राजलक्ष्मी शिवणकर यांनी ही माहिती दिली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अनेकांची नावे आहेत, त्यात इनामदार यांचेही नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी माजी महापौर प्रशांत जगताप यांना पत्र लिहिलेले आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रभाग क्रमांक नऊमधील दोन नगरसेवकांनी पक्ष सोडून भाजपत प्रवेश केला आहे. त्यावर बोलताना पक्षांतरासाठी निधी देण्याचे आमिष दाखवले जाते. स्वतःच्या स्वार्थासाठी जे गद्दार पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना जनता नक्कीच जागा दाखवून देईल, असा इशारा खासदार गायकवाड यांनी दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शिवआरोग्य सेनेचे अध्यक्षपदही राऊळ यांनी सोडले आहे. शुभा राऊळ ह्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट न मिळालेल्या भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. अशा २२ जणांवर आता पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. पक्षशिस्तीचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून आज मुंबई महपालिका निवडणुकीसाठी वचननामा प्रकाशित केला. यावेळी उध्दव ठाकरेंनी भाजप व एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल चढविला. त्यानंतर काही वेळातच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरेंवर पलटवार केला. त्यांनी ठाकरेंची सत्ता असताना २५ वर्षांत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी यादीच वाचून दाखविली. तसेच निवडणुकीनंतर दोन्ही बंधू पुन्हा एकत्र दिसणार नाही, असे चॅलेंज साटम यांनी दिले.
भाजपचे वसई तालुका सहसंयोजन महेश कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्याचा बहुजन विकास आघाडीत पक्ष प्रवेश केला. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांकडून छोट्या कार्यकर्ते यांना डावलले जात असल्याचं सांगत भाजपला सोडले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे कार्यकर्ते भाजपला सोडून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीत पक्ष प्रवेश करत असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
सोलापूर इथं मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे हत्याप्रकरणी अमित ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली. या घटनेवर संताप व्यक्त करताना, तुम्हाला निवडणुका जिंकायच्या असतील, तर जिंकत राहा. पण महाराष्ट्रात निवडणुकीत, अशा हत्या नको आहेत. मी याबाबत थेट आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बोलणार आहे, असे म्हटले आहे. तसंच संबंधित मनसे कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची काय जबाबदारी घ्यायची आहे ती घेऊ, ते जाहीरपणे काही सांगायच्या गोष्टी नाहीत, असे अमित ठाकरे यांनी म्हटले.
सत्ताधाऱ्यांचा भाजपचा महापौर झाल्यास, मुंबईची अदानीस्थान होईल, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईतील चांगल्या विकासकामांना केंद्र व राज्य सरकारने विरोध करून दाखवावा, असं खुलं आव्हान राज ठाकरेंनी दिलं.
महाराष्ट्रातील प्रत्येक महापौर मराठीच होणार, असे ठासून सांगताना, आम्ही हिंदी नाहीत, हिंदू आहोत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईचा महापौर मराठीच होणार, असा राज ठाकरेंनी पु्न्हा ठासून सांगितलं.
मुंबईतील विकास कामांच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरे यांनी भाजप महायुतीवर जोरदार प्रहार केला. 'कैलास पर्वत मोदींनी बांधला, पृथ्वीवर गंगा मोदींनी आणली, अरबी समुद्र मिंधे अन् फडणवीसांनी आणला, समुद्र मंथनातून शिवस्मारक बाहेर काढावं,' अशी खोचक टिका केली.
बिनविरोध निवडणुका हा लोकशाहींचा अपमान आहे. राहुल नार्वेकर आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करतो आहे. अध्यक्षांना निलंबित करून गुन्हा दाखल झाला पाहिजे. मंत्र्यांना सुद्धा लवाजमा घेऊन प्रचारात जाण्याचा अधिकार नसतो, याची आठवण करून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा संयुक्त वचननामा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हस्ते प्रसिद्ध झाला. शब्द ठाकरेंचा, असे या वचननामाचं नाव आहे.
आधी उमेदवारांसाठी इच्छुकांचा आक्रोश पाहायला मिळाला, तर आता मतदारांचा मूलभूत सुविधांसाठी आक्रोश दिसून येत आहे. अकोला महापालिकेतल्या प्रभाग 14 मध्ये मूलभूत सुविधांसाठी मतदारांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. शिवणी भागातील बहुजन नगरातल्या नागरिकांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.'मूलभूत सुविधांसाठी आमचा मतदानावर बहिष्कार' असे बॅनर देखील परिसरात लावण्यात आले आहेत. बहुजन नगरात गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांकडं लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करीत इथल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले पवन करवर यांनी, आज वंचितमध्ये प्रवेश केला. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत परभणीतील जाहीर सभेत पवन करवर यांनी हा प्रवेश केला. ज्यामुळे पवन करवर याने लक्ष्मण हाकेंना का सोडलं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मध्यंतरी पवन करवर यांना बीडमध्ये मारहाण झाली होती. त्यानंतर आज ते थेट वंचितच्या स्टेजवर दिसले आहेत.
राज ठाकरे तब्बल 20 वर्षानंतर शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची प्रेस होईल. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे स्वागत करत, त्यांना शिवसेना भवनात आणलं. यावेळी दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनात गर्दी केली होती.
खोपोली इथले मंगेश काळोखे हत्याकांडामागे राजकीय द्वेष असल्याचे उघड झाले आहे. देवकर याने 20 लाख रुपयांची सुपारी ईशा शेख या महिलेमार्फत आदिल शेख, खादिल कुरेश आणि एक मारेकरी, अशा तिघांना दिली होती, अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. रविंद्र देवकर, दर्शन देवकर, धनेश देवकर, उर्मिला देवकर, विषाल देशमुख, महेश धायतडक, सागर मोरे, सचिन खराडे, दिलीप पवार, ओंकर मगर, सचिन चव्हाण, ईशा शेख, आदिल शेख, खादिल कुरेशी, अशा 14 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एक मारेकरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा कटात सहभागी असल्याप्रकरणी तपास सुरू आहे, अशी माहिती रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.
मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे हत्याप्रकरणी सोलापुरात महाविकास आघाडीने मुक आंदोलनाला सुरूवात झाली आहे. सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून काळी फित लावून निदर्शन केली. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय नेते दोन तास आंदोलन करणार आहेत.
हडपसरमधील सादिक उर्फ बाबू कपूर (वय 56) या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. अजित पवारांचया राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख शेख यांच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी सादिक यांना पत्र राजकीय नेत्यांना पत्र लिहून आपल्या दु:खाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता.
मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाची छुपी युती झाली असल्याचा आरोप भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे. शिवसेनेचे काही उमेदवार सुरक्षित करण्यासाठी काँग्रेसने आपले अधिकृत उमेदवार मागे घेतले. एखाद्या राजकीय पक्षाने एबी फॉर्म दिलेले आपले अधिकृत उमेदवार मागे घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही मेहता यांनी सांगितले. काँग्रेसने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
परभणी शहरातील सर्व जागा आम्ही लढवत जरी नसलो तरी ज्या जागा लढत आहोत त्या जागा शंभर टक्के जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते परभणी मध्ये प्रचारासाठी येणार असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. तर शंभर टक्के परभणीत महापौर हा भाजपचाच होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी भाजपकडून मुंबईतील वॉर्ड क्रमांक 107 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वॉर्डात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या वॉर्डात हंसराज दानानी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आता पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने नील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यावर प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी 'मी नीलला विचारलं तू काय उद्धव काकांना डोळा मारला होता का? असं म्हणत ठाकरेंना टोला लगावला आहे.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे दोघे बंधू आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. त्यासाठी राज ठाकरे जवळपास 20 वर्षांनी शिवसेना भवनात जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.