Maharashtra Political Live Update : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव

Sarkarnama breaking Updates : एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या संघर्षाची ठिणगी, आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू, पुणे जमी गैरव्यवहार प्रकरणी विरोध आक्रमक यासह राज्य आणि देशभरातली घडामोडी वाचा.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Bhaskar Jadhav : सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटतेय

सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटतेय, विरोधी पक्षनेता दिला तर सरकारमधीलच सहकारी त्याला माहिती देऊन आपल्याला अडचणीत आणतील अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळेच सरकार विरोधी पक्षनेत्यावर कोणताही निर्णय घेत नाही, असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी टीका केली. कोकणात ठाकरेंची शिवसेनाच चालेल, आदित्य ठाकरेंसाठी विरोधी पक्षनेतेपदाचा एका क्षणात त्याग करेन, असेही भास्कर जाधव म्हणाले.

Devendra Fadnavis : वंदे मातरमवर जे काही आघात झाले त्यासाठी काँग्रेसच जबाबदार

वंदे मातरमवर कधीच बॅन लागलेला नाही, वंदे मातरमवर जे काही आघात झाले त्यासाठी काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव पारित करून वंदे मातरमला कापलं आणि अर्धेच वंदे मातरम गायलं जाईल असं केलं. आज त्याच काँग्रेससोबत गळ्याला गळा मिळवून आदित्य ठाकरे रोज फिरतात, त्यांनी भाजपला नाही तर काँग्रेसला प्रश्न विचारला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, भाजपच्या कार्यकाळात वंदे मातरमचा नेहमीच सन्मान झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Shirsat : हॉस्टेलमध्ये मिळत असलेल्या सोयी सुविधाची केली चौकशी

राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला उपराजधानी नागपूरमधे सुरूवात झाली आहे. या अधिवेशनासाठी राज्य सरकारचे सर्व मंत्री आणि आमदार नागपूरात दाखल झाले आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हेही अधिवेशनासाठी नागपूरात दाखल झाले आहेत. अशातच आज त्यांनी नागपूरमधील एका हॉस्टेलवर धाड टाकली. यावेळी त्यांच्यासोबत काही अधिकारीही होते. हॉस्टेलमध्ये कोणत्या सोयी सुविधा मिळणार आहेत याची त्यांनी चौकशी केली. तसेच अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. यानंतर बोलताना मंत्री शिरसाट काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

एमपीएससी गट  ब पूर्व परीक्षा चार जानेवारीला 

राज्य लोकसेवा आयोगाकडून 21 डिसेंबरला गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, याच दिवशी नगरपंचायत आणि नगरपालिकांचे निकला जाहीर होत असल्याने पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. आता चार जानेवारीला ही परीक्षा होणार आहे.

'वंदेमातरम'मुळे देशाचा नवीन ऊर्जा मिळाली: मोदी

इंग्रजांनी तोडा-फोडा ही नीती राबवली, 'वंदेमातरम'मुळे देशाचा नवीन ऊर्जा मिळाली. भारतीय विचारांना पुर्नजीवीत केले- मोदी

PM Modi : वंदे मातरम त्यागाचे प्रतिक:मोदी

'वंदे मातरम' मुळे आम्हाला वेदीक काळाची आठवण येते, वंदे मातरम त्यागाचे प्रतिक आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. संसदेच्या सभागृहात ते बोलत होते.

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सयाजी शिंदे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी तपोवनातील झाडे तोडू नका या आमच्या भूमिकेवर पाठिंबा दिला. यानिमित्ताने त्यांची आज भेट घेतली, असे अभिनेता सयाजी शिंदे यांनी सांगितले.

जरांगेंच्या आरोपावर मुंडे काय म्हणाले?

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिली दिली होती. यावर प्रतिक्रिया देण्यास मुंडे यांनी नकार दिला आहे. याबाबत एसआयटी नेमली असून मला यावर काहीही बोलायचे नाही, असे मुंडे म्हणाले.

हिवाळी अधिवेशनास सुरुवात...

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनास सुरवात झाली आहे. रायगडच्या पालकमंत्री शिवसेनेचाच होईल, असे ठाम मत शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केले आहे.

MNS News: सयाजी शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना 

नाशिकमधील तपोवन झाडे तोड प्रकरणी अभिनेता सयाजी शिंदे हे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत अमेय खोपकर आहेत.

Ajit Pawar: अजित पवार अधिवेशनासाठी दाखल 

हिवाळी अधिवेशनास लवकरच सुरवात होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदार सभागृहात दाखल होत आहेत.

Vande Mataram: नरेंद्र मोदी करणार सभागृहात संबोधित करणार

'वंदे मातरम'वर आजपासून लोकसभेत विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाला संबोधित करणार आहेत. 'वंदे मातरम्' च्या अनेक महत्त्वाच्या आणि अपरिचित पैलूंचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या चर्चेला संबोधित करणार आहेत.

बनावट एक्झि पोलची निवडणूक आयोगाकडून दखल

धाराशिव नगर परिषद निवडणूकी दरम्यान बनावट एक्झिट पोल प्रसारीत करीत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षाचे राकेश सुर्यवंशी यांनीराज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, आता या प्रकरणी आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची भाजप आमदाराची मागणी

दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी भाजप आमदार कृष्णा यांनी केली आहे. खोपडे हे विधानसभेत लक्षवेधी मांडणार आहेत. खोपडे यांनी दावा केला की, मुंडे हे नागपूर पालिकेचे आयुक्त असताना त्यांची नियुक्ती केली नसताना देखील त्यांनी स्मार्ट सिटीवर आपले नियंत्रण ठेवले

असंवेदनशील सरकार, वडेट्टीवारांची टीका

विदर्भात हिवाळी अधिवेशन होत असताना त्याचा कालावधी अवघा ७ दिवस आहे. संपूर्ण देशात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रात होत आहे. राज्यात दिवसाला ८ शेतकऱ्यांचे आत्महत्या होत आहे. निवडणुकीच्या आधी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली पण त्याला सरकारला मुहूर्त सापडत नाही. दुसरीकडे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना फुकटे म्हणाले. मंत्री विखे पाटील यांनी देखील शेतकऱ्यांचा अपमान केला. यातून सरकारची शेतकरी विरोधी भूमिका स्पष्ट होत आहे, अशी टीका काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

भाजपची सिक्रेट फाईल ठाकरेंच्या हाती

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहरातील भाजपच्या भ्रष्टाचार आणि गलथान कारभाराची सिक्रेट फाइल्स वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केली.

winter session : थंडीत राजकीय वातावरण पेटणार, आजपासून विधीमंडळाचे अधिवेशन

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. सरकारच्या चहापाण्यावर बहिष्कार टाकून विरोधकांनी सरकारला अधिवेशनात जोरदार विरोध करणार असल्याचे दाखवून दिले आहे.विजय वडेट्टीवार यांनी विदर्भाला पुरेसा निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण देखील अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com