Maharashtra Politics Update : पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Maharashtra Politics Breaking Live Marathi Headlines Updates : पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी मोठा संशय व्यक्त करत मंत्रालयातील इतर लोकांना देखील कारणीभूत ठरवलं आहे, यासह 09 नोव्हेंबर 2025 च्या राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

परळीत भाजप स्वबळावर लढणार? पंकजा मुंडेंच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा

केंद्रात सत्ता, राज्यातल्या सत्तेत पक्ष मोठा भाऊ आहे. त्यामुळे जिल्ह्यातही पक्षाचे संघटन मजबूत करायचे तर आता होणारी नगर पालिका निवडणुक सर्वच ठिकाणी स्वबळावर लढवावी, असा भाजपमधील काही नेते आणि पदाधिकार्‍यांचा मतप्रवाह आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिल्यामुळे भाजपलाही स्वबळाशिवाय पर्याय नाही. तर, परळीतही पक्षाने स्वबळ पॅटर्न राबवावा, असे पदाधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र, यावर पंकजा मुंडे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Pune Land Scam : पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीच्या अडचणी वाढणार

पार्थ पवार यांच्या मालकीच्या 'अमेडिया कंपनी'मार्फत करण्यात आलेल्या 40 एकर जमीन व्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल किसनचंद तेजवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण पुणे पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून तेजवानीची माहिती मागवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता तेजवणीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Tanaji Sawant : भूम, परंडा नगरपरिषदेत तानाजी सावंतांचा स्वबळाचा नारा

धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात मित्रपक्षांसह विरोधकही एकवटले आहेत. याबाबत सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक देखील पार पडली आहे. त्यानंतर सावंता यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे, भाजप सरकार भ्रष्टाचारानं माखलंय - आदित्य ठाकरे

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील अटल सेतूवरMMRDA कडून डागडुजीचे काम सुरू करण्यात आलं आहे. यावरून त्यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'जगात कुठल्याच देशामध्ये असा भ्रष्टाचार सहन केला जात नसेल, फेकनाथ मिंधे, भाजप सरकार भ्रष्टाचारानं माखलंय. मागच्या वर्षी उद्घाटन झालेल्या या पुलाचा काही भाग खराब झाल्याने एमएमआरडीएने डागडुजीचे काम हाती घेतलं आहे.'

'हे एकट्या अजित पवारांचं काम नव्हे...' पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी व्यक्त केला वेगळाच संशय

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्य हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'स्वस्तात जमिनी खरेदी करून महागात विकण्यासाठी रचलेली कारस्थानं समोर आली आहेत. पार्थ पवार यांच्याशी संबंधित गैरव्यवहार समोर आलाय. ज्यामध्ये शासकीय दस्तावेजांमध्ये मोडतोड केलीय आयटी पार्क उभारण्यासाठी जमिनी खरेदी करत असल्याचे सांगून अवघ्या 24 तासांत परवानग्या मिळवल्या. इतर शासकीय परवानग्या मिळवणं हे एकट्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काम नव्हे. हा संघटित गुन्ह्याचा प्रकार आहे. विविध मंत्रालयातील लोक यामध्ये सहभागी आहेत. हा घोटाळ्यात अनेक लोकांचे हात गुंतलेत.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com