Maharashtra Politics Live Update : मोठी बातमी! ऐन दिवाळीच्या सणासुदीत एसटी कर्मचारी संप पुकारणार

Marathi latest Politics live news updates : मोठी घडामोड! PM मोदी यांची भाजप आमदार अन् खासदार यांच्यासोबत बैठक सुरू
ST Strike News Updates, ST employees Strike News, ST Strike News Updates
ST Strike News Updates, ST employees Strike News, ST Strike News Updates Sarkarnama
Published on
Updated on

मोठी बातमी! ऐन दिवाळीच्या सणासुदीत एसटी कर्मचारी संप पुकारणार 

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी एसटी कर्मचारी यांनी केलेली चर्चा फिस्कटली आहे. या बैठकीत मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचारी हे 13 ऑक्टोबरपासून चक्का जामचा इशारा दिला आहे. ऐन दिवाळीच्या सणासुदीत एसटी कर्मचारी संप पुकारण्याच्या तयारीत असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

मोठी घडामोड! PM मोदी यांची भाजप आमदार अन् खासदार यांच्यासोबत बैठक सुरू

मुंबईतील राजभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप आमदार आणि खासदार यांच्यासोबत बैठक सुरू आहेत. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची कबुली,निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्रपरवाना

गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते योगेश कदम यांच्या सहीनेच गुंड निलेश घायवळचा सख्खा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आता गृहराज्यमंत्री कदम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.त्यांनी निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्रपरवाना दिल्याचं सांगितलं आहे.

Sachin Ghayval : घायवळवर पुणे पोलिसांत गंभीर गुन्हे दाखल

योगेश कदमांच्या सहीने सचिन घायवळला 20 जून रोजी शस्त्रपरवाना पोलिसांचा विरोध डावलून देण्यात आला आहे. सचिन घायवळवर पुणे पोलिसांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. घायवळला शस्त्रपरवाना देऊ नये असे पोलिसांनी गृहखात्याला अहवाल दिला होता.

MvA News : महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत राज ठाकरेंचे एकत्रित बॅनर

ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत सामील झालीय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाण्यात एकाच बॅनरवर शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राहुल गांधी यांचे फोटो पाहायला मिळाले. त्यामुळे मनसेची मविआत एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली. राष्ट्रवादी शरद पवार युवक अध्यक्ष अभिजीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे पदाधिकाऱ्याने हे बॅनर लावले आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Narendra Modi : मुंबईत घडामोडींना आला वेग

Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. असे असताना आता राजधानी मुंबईत मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाच्या आमदार, खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत PM किसानची 2000 रूपये ही रक्कम पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे.

Uddhav Thackeray News : हर्षद नेगीनहाळ यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाचे अध्यक्ष हर्षद नेगीनहाळ ह्यांनी त्यांच्या संघटनेतील सहकाऱ्यांसह आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

RBI action : समर्थ बँकेवर कारवाई 

सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे ग्राहकांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत. त्यामुळे ग्राहक हवालदिल झाले आहेत.

PM Modi Update : आमदार, खासदारांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईतील भाजपचे आमदार आणि खासदारांशी संवाद साधणार असल्याचे समजते. राजभवन येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

PM Modi update : काँग्रेसवर टीकास्त्र

मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र केले. त्यावेळी भारत पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी तयार होता. पण परदेशातील दबावामुळे हल्ला केला नाही. काँग्रेसने कुणाच्या दबावाखाली हल्ला रोखला, हे सांगायला हवे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे दहशतवाद्यांचे मनोबल वाढल्याची टीका मोदींनी केले.

PM Modi Live update : विकसित भारताची झलक

आज संपूर्ण देश विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मागील ११ वर्षांत भारताच्या कानाकोपऱ्यात याच भावनेतून वेगाने काम होत आहे. नवी मुंबई विमानतळाच्या प्रकल्पामध्ये विकसित भारताची झलक आहे, असे मोदी म्हणाले.

PM Modi Live : मुंबईतील मेट्रो विकसित भारताचे प्रतिक

आज मुंबईला आपले दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. हे विमानतळ या भागाला आशियातील सर्वात मोठ्या कनेक्टिव्हिटी हबमध्ये रुपांतरीत करण्यात मोठी भूमिका निभावेल. मुंबईला आज भूमिगत मेट्रोही मिळाली. विकसित भारताचे हे प्रतिक असल्याचे मोदी म्हणाले.

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या : शिवसेनेची निदर्शने

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची तात्काळ दखल घेत भरपाई मिळावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संभाजी नागरात निदर्शने करण्यात येत आहेत. आमदार अंबादास दानवे यांच्यासह माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील या निदर्शने आंदोलनांमध्ये सहभागी झाले आहेत.

शिवसेनेचा धनुष्यबाण आम्हाला द्या नाहीतर गोठवा, ठाकरेंचा शिलेदार भावूक

शिवसेना आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह कोणाचं यावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी होणार होती. पण त्यासंदर्भात आता पुढची तारीख देण्यात आली आहे. यावर बोलताना ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. त्यांनी, पक्ष धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यावं, अन्यथा ते गोठवा, अशी हात जोडून विनंती न्यायालयास असल्याचे म्हटलं आहे

मुख्यमंत्र्यांनी बजावून देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बँकेकडून वसुलीची नोटीस

अतिवृष्टीने एकीकडे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बँकेकडून वसुलीची नोटीसा पाठवल्या जात आहेत. यामुळे शेतकरी संतापला असून सरकारविरोधात रोष व्यक्त केला जातोय. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीच दिवसांपूर्वी बँकांना वसुलीच्या नोटीसा शेतकऱ्यांना पाठवू नये अशा सक्त सूचना केल्या होत्या. मात्र मराठवाड्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्याचा धडाका बँकांनी लावला आहे.

बदलापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर, 24 प्रभागातून 49 नगरसेवक निवडले जाणार

बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झालय. बदलापूरमध्ये एकूण 24 प्रभाग असून पॅनल पद्धतीने निवडणूक होणार आहे. या ठिकाणी 49 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. यापैकी ST-02, SC-7, OBC-13 आणि उर्वरित उमेदवार खुल्या प्रवर्गातील असणार आहेत. दिवाळीनंतर बदलापूर नगरपरिषदेची निवडणूक जाहीर होऊ शकते.

नागपूर महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली

नागपूर महापालिका पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने जोरदार प्लॅनिंग करत कंबर कसली आहे. यंदाच्या निवडणुकीत 130 नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट भाजपने घेतले असून त्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले जात आहे. यासाठी सर्व मंडळात जाऊन भाजपचे शहराध्यक्ष प्रत्येकाशी चर्चा करून उमेदवारांची चाचपणी करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मुंबई मेट्रो लाईन-3 चं आज अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन

मुंबईकरांची मेट्रोसाठीची प्रतिक्षा आता संपणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाईन-3 (अक्वा लाईन) च्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन (ता.9 ऑक्टोबर रोजी) होणार आहे. या मेट्रो लाईनची एकूण लांबी 33.5 किलोमीटर ज्यात कफ परेड ते आरे कॉलनी दरम्यान 27 स्थानके आहेत. 

सोलापूरच्या समर्थ बँकेवर RBI ची मोठी कारवाई

ऐन दिवाळीच्या तोंडावर सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले आहेत. या कारवाईमुळे ठेवीदारांसह खातेदार चिंतेत आले असून बँकेसमोर गर्दी झाली आहे. तर आम्हाला आमचे पैसे द्या अन्यथा बँकेत तोडफोड करू, बँक कर्मचाऱ्यांना आम्ही बाहेरही जाऊ देणार नाही अशा आक्रमक पवित्रा ठेवीदारांसह खातेदार घेताना दिसत आहेत.

शाहरूख खान यांना मोठा झटका, समीर वानखेडे यांची याचिका दिल्ली हायकोर्टाने स्वीकारली

नेटफ्लिक्सवर असलेल्या शोमध्ये समीर वानखेडे यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखविली असल्याच्या आरोपाखाली समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टाने ही याचिका स्वीकारली आहे. त्यामुळे शाहरूख खान यांना मोठा झटका बसला आहे. वानखेडे यांनी नेटफ्लिक्स आणि रेड चीलीज यांना नोटीस जारी केली होती. त्यावर कोर्टाने येत्या 7 दिवसांत सर्व उत्तर द्यावे असा आदेश दिला आहे. समीर वानखेडे यांनी शो चे निर्माता यांच्यावर मानहानीचा दावा केला होता.

Shivsena News : शिवसेना कुणाची? 12  नोव्हेंबरला सुनावणी

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि दोन्ही गटांच्या दाव्यांवर पुन्हा एकदा युक्तिवाद होणार आहेत.

Shivsena live : शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणीस सुरवात

शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतची लवकरच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरु होत आहे. आज निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबाला तानाजी सावंतांकडून मदत

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या संजय पवार यांच्या कुटुंबाला माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी तीन लाख रुपयाची मदत केली आहे. बीडच्या घोसापुरी गावातील संजय पवार यांचा मुंबई येथील मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्यु झाला होता.

Beed News: बीड पुन्हा हादरले

बीडमध्ये शेतीच्या वादातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात भावकीतील चार जणांनी एका महिलेला निर्दयीपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न केलाय. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडिता आश्विनी येडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nagpur News: नागपूरात महसुल सेवकांचे उपोषण सुरु

नागपूरात महसुल सेवकांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. संविधान चौकात आंदोलन सुरू आहे. कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी मिळावी, यासाठी महसूल सेवक संघटनेचं आंदोलन सुरु आहे. उपोषणामुळे गावगावातील सर्वे, पंचनामा, आणि महसूल विभागाच्या गाव स्तरावरील कामांवर परिणाम झाला आहे.

Radhakrishna vikhe Patil : हिंदुत्ववादी संघटनांमुळेच राज्यात महायुतीचे सरकार - राधाकृष्ण विखे पाटील

विधानसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी संघटनांनी समाजात केलेल्या प्रबोधनामुळेच राज्यात महायुतीचे सरकार आलं. त्यांच्या आशीर्वादाने मिळालेले हे यश म्हणजे महाराष्ट्राने देशापुढे एक उदाहरण निर्माण केल्याचं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत

राज्यातील अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक देवस्थानांकडून मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशातच आता पुण्यातील प्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने देखील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल 1 कोटींचा निधी दिला आहे. ही मतद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

Shivsena : शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होईल का? असीम सरोदेंंनी उपस्थित केला प्रश्न

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे. मात्र, ही सुनावणी होण्यापूर्वीच आता सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी एक्सवर पोस्ट करत मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. असीम सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण जस्टीस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर आज 16 नंबरला लागलेले असल्याने ते प्रकरण सुनावणीसाठी रिच होणार हे नक्की. परंतु एका इतर एका अर्धवट सुनावणी झालेल्या प्रकरणातील बेंचचे सुद्धा जस्टीस सूर्यकांत सदस्य न्यायाधीश आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होईल का? असे प्रश्नचिन्ह आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यातर्फे असे प्रयत्न होतीलच की सुनावणी पुढे ढकलली जावी.' असं ट्विट करत सरोदे यांनी आजची सुनावणी पुढे ढकलली जावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न केले जातील असा संशय व्यक्त केला आहे.

Miraj Clash : सांगलीतील मिरजेत दोन गटात तुफान राडा, पोलिसांकडून लाठीचार्च

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे दोन गटात मोठा राडा झाल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या शहरात मोठा पोलिस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. मिरज शहरातील नदीवेस परिसरातील एका गल्लीत वेगवेगळ्या समाजातील दोन ओळखीचे तरुण रात्री बोलत बसले होते. बोलत असताना दोघांकडून एकमेकांच्या समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्यामुळे चर्चेचं रुपांतर वादात झालं.

यावेळी एका समाजाच्या गटाकडून तरुणास मारहाण करण्यात आली. तर संबंधित तरुणावर कारवाई करावी, या मागणीसाठी जमाव मिरज शहर पोलीस ठाण्यात जमला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, तरीही त्या मुलाच्या घरासमोर जमलेल्या जमावातील काहींनी तेथील राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडल्यामुळे वाद चिघळला आणि त्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवस मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांच्या हस्ते नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणि मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.

Narendra Modi Navi Mumbai Airport : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणि मेट्रो 3 च्या अखेरच्या टप्प्याचं आज उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या विमानतळावर सर्वप्रथम पंतप्रधानांचं विमान उतरणार असून या विमानाला अग्निशमन दलाकडून पाण्याची सलामी देण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com