

Prithviraj Chavan Statement : येत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल, असं भाकीत काँग्रेस ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.
पृथ्वीबाबांच्या याविधानावर काँग्रेसचे नागपूरमधील विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी देखील काॅन्फिडंट व्यक्त करत, 19 डिसेंबरची उत्सुकता वाढवली आहे.
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या मराठी माणूस पंतप्रधान होण्याच्या या विधानाचे पडसाद नागपूर हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. विजय वडेट्टीवार यांनी पृथ्वीराज यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, हा मोठा विषय आहे. आज त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. दोन महिने थांबा, देशात काय घडते ते सर्वांना दिसेल, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
आमदार भास्कर जाधव यांनी, 'पृथ्वीराज चव्हाण अनुभवी नेते आहेत. त्यांनी दिल्लीत (Delhi) तसेच पंतप्रधान कार्यालयात काम केले आहे. त्यामुळे त्यांची वक्तव्ये कधीही उथळ नसतात आणि ती गांभीर्याने घेण्याची गरज आहे,' असे म्हणत पृथ्वीराज यांच्या विधानाची अधिकच उत्सुकता वाढवली.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या मराठी माणूस पंतप्रधान होईल, असे सांगताना, तो भाजपचाच असेल, असे म्हटले आहे. 'अमेरिकेतली व्यक्ती जो इस्त्रायलचा गुप्तहेर आहे. त्याने मोठं स्टिंग ऑपरेशन केलं आहे. यात जगभरातील दिग्गजांची नावे आहेत. पण ती नावे कोणाची आहेत, याची कल्पना नाही. अमेरिका सरकार एक कायदा तयार करून ती नावे उघड करत आहेत. त्याचे जगभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता आहे,' असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजप मंत्री आशिष शेलार यांनी, एवढ्या वरिष्ठ नेत्या, माजी मुख्यमंत्र्यांनी, इतकं बालिश विधान कराव, हे दुर्दैव आहे. ज्याचं कराडमध्ये स्वतःचं राजकीय बूड स्थिर नाही, त्यांना तिथं कोणी विचारत नाही, त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानांवर बोलू नये. त्यांचे विधान म्हणजे, हा देशातील सर्वात बिगेस्ट जोक आहे, असा टोला लगावला.
19 डिसेंबरला अवघे चार दिवस राहिले आहे. त्यामुळे नेमकं काय होत आहे, याची उत्सुकता आहे. 19 डिसेंबर जशी जवळ येत आहे, तसे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यावर प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. पृथ्वीराज यांच्या काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून सावधपणे प्रतिक्रिया दिल्या जात आहे. पृथ्वीराजबाबांचे विधान चुकीचे ठरू नये अन् आपण तोंडघशी पडू नये, त्यामुळे काँग्रेसमधील नेते पृथ्वीराज यांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेते, मात्र जे काही होईल, ते पाहत राहू, असे म्हणत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.