
युवराज धोतरे
Udgir News : राज्यात महायुती सरकार पुन्हा एकदा ऐतिहासिक बहुमतासह सत्तेत परतल्यानंतर एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेतले जात आहेत. अशातच मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रशासनात मोठी उलथापालथ सुरू आहे. आयएएस आणि आयपीएस वरिष्ठ नेत्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. अशातच आता मराठवाड्यातील उदगीरमधून एक मोठी अपडेट समोर येत आहे.
महसूल विभागातील बहु चर्चित व दहा दहा वर्षे ठाण मांडून बसलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांची महसूल विभागाने दखल घेत बदल्या केल्या आहेत. उदगीर तालुक्यातील सतरा तलाठी (Talathi) व चार मंडळ अधिकाऱ्यांना तालुक्या बाहेर बदली करण्यात आली आहे. तर बाहेरून उदगीरला वीस तलाठी व दोन मंडळाधिकारी यांची नियुक्ती केल्याचे बदली आदेश जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नटवे यांनी गुरुवारी (ता.29) रोजी सायंकाळी काढले आहेत.
बदली करण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण) पंडीत जाधव हेर (घोणशी), गणेश हिवरे वाढवणा (बोरोळ), संतोष चहाण नळगीर (लामजना), शंकर जाधव उदगीर (देवणी), तर देवणीच्या मंडळ अधिकारी श्रीमती ए. ए. ढगे हेर येथे लामजन्याचे आर एच हाश्मी यांची उदगीरचे मंडळ अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
उदगीर तालुक्यातील गावनिहाय बदली झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण) अमोल रामशेट्टे निडेबन (अंबुलगा ता.निलंगा), बाबासाहेब कांबळे कौळखेड (मदनसुरी ता.निलंगा), सतीश लोहार रावणगाव (हलगरा, ता. निलंगा) बालाजी नागरगोजे वाढवणा ममदापूर (ता.निलंगा), विनिता पाटील, (मोघा ता.अहमदपूर) संगीता माटरोल नळगीर कोनाळी (ता.देवणी), परशुराम जामतीने, किनी याल्लादेवी (मंगळूर ता. जळकोट) दत्तात्रय मोरे दावणगाव डोंग्रर (ता.चाकूर) मेघशाम होळंबे, टाकळी (बोरगाव (ता.चाकूर), आर एस गुंडरे लोणी (ताडमुळी ता.चाकुर) कुलदीप गायकवाड हाळी (आर्वी ता.लातूर), शिवानंद गुंडरे गुडसूर चाकूर-1, संतोष पाटील तोंडचिर कन्हेरी (ता.लातूर) ए.जी.वडगावे लोहारा शेळगाव (ता.चाकूर) श्रीमती ए व्ही शिंदे धोंडीहीप्परगा माकणी (ता. अहमदपूर) सोनाली पकाले नागलगाव (मोठेगाव ता. रेणापुर) सुषमा भंडारे शेकापूर (थोडगा ता.अहमदपूर) यांची बदली करण्यात आली आहे.
उदगीर तालुक्यात रिक्त झालेल्या वीस गावात जिल्हाभरातून नियुक्ती करण्यात आलेल्या तलाठ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.प्रमोद मादळे- येणकी, माधव केंद्र- तोंडार, महेश गुपीले-निडेबन, प्रियंका पवार-किनी चल्ल्लादेवी, माधव जवळगे-भाकसखेडा, गणेश राठोड- कौळखेड, टी. एस. उसनाळे -टाकळी, डी. टी. जाधव - नागलगाव, जी. जी. माने रावणगाव, पी. बी. तेरकर-लोणी, माधव कवडेकर-गुडसूर, संदीप गवारे लोहारा, एम. आर. सुर्यवंशी-तोंडचिर समीरखान पठाण -नळगीर, प्रशांत बिराजदार -हाळी, एम. एम. शेख- वाढवणा, पी. डी. वंगवाड-मोघा, मजहरअली शेख -शेकापूर, शिवराज कांबळे डोंगरशेळकी, गजानन मुळे कुमठा.
या बदली आदेशामुळे महसूल विभागात (Revenue Department) एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये अनेकांना सोयीचे ठिकाण मिळाले आहे तर अनेकजणांना सोयीचे ठिकाण मिळाले नसल्याने यामध्ये आर्थिक व्यवहार झाला काय? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.