Talathi Transfers : तलाठी भाऊसाहेब आता 'नो-वशिलेबाजी'; 'ट्रान्सफर'ची बदलणार कार्यपद्धती!

The State Government Will Make The Talathi Transfer Process Online : तलाठी बदलीतील गैरप्रकार, वशिलेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारने अभ्यास गटाची स्थापना केली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार या अभ्यास गटाचे अध्यक्ष असून सहा सदस्य आणि एक सचिव या अभ्यास गटात असणार आहे.
talathi transfer1
talathi transfer1sarkarnama
Published on
Updated on

Talathi Transfer Process Online : गावचा सातबारा हातात ठेवणाऱ्या तलाठ्यांच्या बदल्यांमध्ये आता वशिलेबाजी चालणार नाही. तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. राज्य सरकारने तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याची कार्यपद्धती निश्चित करत असून, यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली आहे. या अभ्यास गटाला राज्य सरकारला 15 दिवसांत अहवाल सादर करायचा आहे.

तलाठ्यांच्या बदल्या होताना त्यात वशिलेबाजी, तसेच मर्जीतील तलाठ्यांना मोठे गाव देण्याच्या प्रकार व्हायचे. यापूर्वी तलाठ्यांच्या बदलीचे अधिकारी प्रांताधिकाऱ्यांना होते. त्यामुळे एक किंवा दोन तालुक्यांमध्ये तलाठ्यांची सेवा होऊन ते निवृत्त व्हायचे. तसेच काही तलाठी वजन वापरून किंवा राजकीय दबाव आणून क्रीम पोस्ट मिळवायचे. यामुळे सप्टेंबर 2023 पासून राज्य सरकारने तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले. यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात तलाठ्याची बदली होणार आहे.

talathi transfer1
Ahmednagar Municipal Corporation : आयुक्त जावळेंची स्टाईलचं वेगळी, 'लेटलतिफांची' घेतली फिरकी

महसूल विभागातील तलाठी बदल्यांमधील गैरप्रकार, वशिलेबाजी, राजकीय दबाव रोखण्यासाठी महायुतीच्या भाजप (BJP) राज्य सरकारने तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाईन (Online) पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली आहे. 2013 पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयांची पुनर्रचना झाली. एका उपविभागीय कार्यालयांतर्गत एक किंवा दोन तालुक्याचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले. तलाठी या संर्वगाची आस्थापना उपविभागीय कार्यालयाच्या स्तरावर आहे. आस्थापनाविषयक बाबी, बिंदूनामावली, बदली आदींबाबत उपविभागीय अधिकारी स्तरावर कार्यवाही होते.

talathi transfer1
Raksha Khadse Politics : वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जळगावला मिळाले केंद्रात मंत्रीपद !

यानुसार तलाठ्यांना केवळ एकाच तालुक्यांमध्ये पूर्ण सेवा कालावधीमध्ये काम करावे लागायचे. यातून तलाठ्यांच्या कामकाजात नावीन्यता आणि उपक्रमशीलता दिसत नव्हती. अभाव दिसायचा. यामुळे राज्य सरकारने तलाठी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर निश्चित करताच तलाठी संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी जिल्हाधिकारी झाले. राज्य सरकारने आता तलाठ्यांच्या बदल्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी ऑनलाईन बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी गट स्थापन केला आहे.

राज्य सरकारने स्थापन केलेल्या अभ्यास गटाचे अध्यक्ष पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आहेत. तसेच नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जवळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर, अपर जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी अभिषेक देशमुख हे सदस्य आहेत तर, पुण्याचे विभागीय उपायुक्तांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com