30-30 Scam : नोटबंदी झाली, अन राठोडला पैसे येणे बंद झाले..

Scams : मोदी सरकारने नोटाबंदी केली आणि कोलकात्यावरून येणारी रसद थांबली.
Thirty-Thirty Scam News, Aurangabad
Thirty-Thirty Scam News, AurangabadSarkarnama

Aurangabad : दोन वर्षापुर्वी उघडकीस आलेल्या ३०-३० घोटाळ्यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ सचिन राठोड (Santosh Ratohod) सध्या हर्सुल तुरुंगात कैद आहे. अनेकवेळा जामीनाचा प्रयत्न करून देखील गुन्ह्याची व्याप्ती पाहता राठोडला जामीन काही मिळाला नाही. नुकताच त्याचा एका व्यक्तीशी झालेल्या संवादाची आॅडिओ क्लीप समाज माध्यमांवर व्हायरल झाली.

Thirty-Thirty Scam News, Aurangabad
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या सभेत घुसखोरी करणाऱ्या बनावट NSG जवानाला अटक

यामध्ये तो मी तुरूंगात मजेत आहे, लवकरच जामीनावर बाहेर येईल असे विश्वासाने सांगतो आहे. या आॅडिओमध्ये राठोड अगदी सहजपणे बोलतांना दिसला. (Scam) एवढा मोठा घोटाळा करून देखील त्याच्या मनात भिती किंवा पश्चातापाचा लवलेश जाणवला नाही. (Aurangabad) फोन करणारी व्यक्ती त्याला ईडी चौकशीचे काय? असे विचारल्यावर ईडी चौकशी म्हणजे सोपी गोष्ट आहे का? असे म्हणत अशी कुठलीही चौकशी शक्य नसल्याचा दावा देखील करतांना दिसतो.

एकंदरित वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या राठोडला शेतकरी, शिक्षक, आमदार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सर्वसामान्यांचे कोट्यावधी रुपये आपण बुडवले याबद्दल काहीच सोयरसुतक नसल्याचे या आॅडीओमधून स्पष्ट होते. १६ जानेवारी २०२३ रोजी राठोडला न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हाचे हे संभाषण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तीस-तीस घोटाळ्याची चौकशी ईडी करणार असल्याची माहिती समोर आली आणि या प्रकरणाची नव्याने चर्चा सुरू झाली. संतोष राठोड आणि त्याच्या ग्रुपने सुरुवातीला ३० आणि शेवटी ५ टक्क्यापर्यंत परतावा दिला. तोपर्यंत गुंतवणूकदार त्यांच्याकडे पैसे आणून देत होते. हा सगळा व्यवहार पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातून केला जायचा, तिकडूनच राठोडला पैसे यायचे, असे सांगितले जाते.

कोलकतावरून नियमित पैसे येत असल्यामुळेच राठोड परताव्याचे पैसे नियमित देवू शकत होता. पण मोदी सरकारने नोटाबंदी केली आणि कोलकात्यावरून येणारी रसद थांबली. तिथून वेळेवर परतावा न देणे, टाळाटाळ करणे असे प्रकार सुरू झाले आणि ३०-३० ग्रुपला घरघर लागल्याची चर्चा आहे. नाशिक, औरंगाबाद आणि कोलकता असे हे कनेक्शन होते. राठोडच्या चार-पाच डायऱ्यांमध्ये या सगळ्या व्यवहारांची, गुंतवणूकदारांची नावे, कुणाला किती व्याज द्यायचे, याची माहिती आणि हिशेब असायचा.

Thirty-Thirty Scam News, Aurangabad
30-30 Scam News : कोट्यावधींचा घोटाळा, पण आरोपी राठोडच कंगाल..

त्यानूसार राठोडला कोलकात्यावरून पैसे यायचे आणि मग त्याचे वाटप रोखीने गुंतवणूकदारांना व्हायचे. विशेष म्हणजे हा पैसा शहरात आल्यानंतर त्याचे एका हाॅटेलात बसून हिशेब आणि वाटपासाठीची तयारी केली जायची. राठोड यांच्यानावावर शहरातील वेगवेळ्या हाॅटेलमध्ये एक रुम कायम बुक असायची. अगदी वर्षभरासाठी, अशी माहिती देखील समोर आली होती.

कोलकात्यावरून नियमित पैसे येत राहिले असते तर राठोडने आणखी किती जणांना आपल्या जाळ्यात ओढले असते याचा अंदाज लावणे कठीण आहे. नोटबंदीचा फटका जसा देशातील, व्यापारी, उद्योजक, सामान्यांना बसला, तसा तो ३०-३० चा मास्टरमाईंड राठोडलाही बसला. आता या आॅडिओ क्लीपमुळे राठोड यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com