30-30 Scam : शेतकऱ्यांना लुटणाऱ्या राठोडने भावाच्या साखरपुड्यात वाटल्या सोन्या-चांदीच्या भेटवस्तू..

Marathwada : आपणहून लोक येत असल्याने संतोष आणि त्याच्या साथीदारांनी खोऱ्याने पैसा ओढला.
Thirty-Thirty Scam News, Aurangabad
Thirty-Thirty Scam News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : दोन वर्षापुर्वी उघडीकस आलेल्या ३०-३० घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार संतोष राठोड हा एका उच्चभ्रू कुटुंबातील ३०-३२ वर्षांचा तरुण. (Scams) झटपट श्रीमंत होण्याच्या शार्टकटच्या नादाला लागला आणि स्वतःसह हजारो शेतकऱ्यांनाही घेवून बुडाला. पाचशे कोटींचा हा घोटाळा, पण राठोड कंगालच कसा? याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त केले जाते.

Thirty-Thirty Scam News, Aurangabad
Crime News विरोधी पक्षनेत्याच्या मुलीला घेऊन भाजप नेता फरार

संतोष राठोड मुळचा कन्नड तालुक्यातील मुंडवाडी तांडा या गावचा. वडिलोपार्जीत शेती, आई-वडील भाऊ असे कुटुंब. (Aurangabad) पण संतोषचे मन काही पहिल्यापासून गावात रमत नव्हते. त्यामुळे तो औरंगाबादलाच जास्त असायचा. समृद्धी महामार्ग, डीएमआयसी, शेंद्रा, धुळे-सोलापूर, आॅरिक सिटीमध्ये शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांकडे आलेल्या कोट्यावधी रुपयांकडे संतोषची नजर वळली आणि तिथूनच ३०-३० च्या घोटाळ्याला सुरूवात झाली. (Marathwada)

लाॅकडाऊन मध्ये सर्वसामान्यांना दोन घास मिळणे दुरापास्त झाले होते, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अशा संकटाच्या काळातही संतोष राठोडचे अलिशान जगणे आश्चर्यकारक होते. लाॅकडाऊन मध्ये आपल्या छोट्या भावाच्या साखरपुड्यात संतोषने मोठी गर्दी जमवत जंगी कार्यक्रम केला. एवढेच नाही तर पाहुण्यांना चक्क सोन्या, चांदीच्या वस्तू भेट म्हणून दिल्याने अनेकांचे डोळे विस्फरले होते.

प्रतिष्ठीत आणि सुखवस्तू कुटुंबातील संतोषवर लोकांनी डोळे मिटून विश्वास टाकला आणि तिथेच घात झाला. बिडकीन आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आपली कोट्यावधींची पुंजी संतोषच्या स्वाधीन केली. त्यानेही सुरूवातीला ३० टक्के आणि उतरती कळा लागली तेव्हा ५ टक्के परतावा देते लोकांना थोपवून ठेवले.गोण्याने पैसे वाटप सुरू असल्यामुळे परताव्याचे प्रमाण ३० वरून ५ टक्यांवर आले असतांना देखील लोकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतवण्यासाठी रांगा लावल्या होत्या.

राठोड याचे मुळगांव असलेल्या कन्नड तालुक्यातून देखील त्याच्याकडे आपणहून लोक येत असल्याने संतोष आणि त्याच्या साथीदारांनी खोऱ्याने पैसा ओढला. पण अति हव्यास गुंतवणूकदार आणि ३०-३० च्या टोळक्याला देखील महागात पडला. पाचेश कोटींची रक्कम बुडाली अन् या पैशावर मौजमजा करणारे आज गजाआड आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com