Crime News विरोधी पक्षनेत्याच्या मुलीला घेऊन भाजप नेता फरार

भाजप नेता विवाहित असून त्याला 21 वर्षांचा मुलगा आणि सात वर्षाची मुलगी आहे.
UP Crime News
UP Crime News
Published on
Updated on

UP Crime News : उत्तर प्रदेशातील हरदोई शहरातील कोतवाली परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यावर समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सपा नेत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला आहे.

आशिष शुक्ला असे या भाजपचा शहर सरचिटणीसाचे नाव आहे. शुक्ला याने सपा नेत्याच्या २६ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. 13 जानेवारी रोजी लग्नाचे आमीष दाखवून 47 वर्षीय आशिष आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा सपा नेत्याने केला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार उघडकीस येताच पक्षाची बदनामी झाल्याच्या कारणास्तव भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी शुक्लाची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

UP Crime News
BJP National President : 2024 पर्यंत जे.पी. नड्डा' राहणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

परिसरात दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध असल्याची चर्चा सुरु आहे. ही बाब कुटुंबियांना कळताच कुटुंबियंनी संबंधित तरुणीचे लग्न दुसरीकडे ठरवले होते. तर, आशिष शुक्ला हा देखील विवाहित असून त्याला २१ वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी असल्याचीही बाब समोर आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी मुलींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन समाजवादी पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. सपा कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या राजवटीत मुली सुरक्षित नसल्याचं म्हटलं आहे. तसेच आशिष शुक्लाने त्याची पत्नी, 21 वर्षीय मुलगा आणि 7 वर्षाच्या मुलीला वाऱ्यावर सोडून आपल्या मानलेल्या बहिणीला फूस लावून घरातून पळवून नेल्याचे म्हटले आहे. यासोबतच उत्तर प्रदेशातील योगी सरकार आपल्या चारित्र्यहीन भाजप नेत्याची पक्षातून हकालपट्टी करतात की, आरोपींना हार घालून त्यांचा गौरव करणार, असा सवालही सपा नेत्यांनी विचारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com