30-30 Scam News : लक्की नंबर म्हणून ग्रुपचे नाव तीस-तीस, राठोड गोणी भरून पैसे वाटायचा..

Aurangabad : बिडकीन पोलिसांत पहिला गुन्हा ३० लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी दाखल झाला आणि तीस-तीसचा भांडाफोड झाला.
Thirty-Thirty Scam News, Aurangabad
Thirty-Thirty Scam News, AurangabadSarkarnama

Aurangabad News: शेंद्रा डीएमआयसी, सोलापूर-धुळे, समृद्धी महामार्ग अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये पाच पट भावाने शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित झाल्या. (Scams) कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांकडे आले आणि याच पैशावर डोळा ठेवत कन्नड तालुक्यातल्या संतोष राठोड नावाच्या तरुणाच्या डोक्यात तीस-तीसची योजना आली. विशेष म्हणजे ३० हा आकडा आपल्यासाठी लक्की आहे, असा राठोड याचा समज होता.

Thirty-Thirty Scam News, Aurangabad
Jalna News: माजी मंत्री टोपेंच्या सुतगिरणीत घोटाळा ; बोगस नोंदीआधारे अनुदान लाटले..

त्यामुळेच त्याने या योजनेसाठी बनवलेल्या ग्रुपचे नावा देखील तीस-तीस ठेवल्याचे बोलले जाते. एवढेच नाही, तर राठोड याने आपले दुसरे लग्न ३० तारखेलाच केले होते, त्याला आपत्यही ३० तारखेलाच झाले असे सांगितले जाते. (Aurangabad) शेतकऱ्यांकडील कोट्यांवधींची रक्कम आपल्या योजनेत गुंतवावी यासाठी त्यांनी ग्रुप देखील ३० लोकांचाच केला होता. (Marathwada)

या लोकांना दिलेले मोबाईल क्रमांक, वाहनांचे व महागड्या गाड्यांचे नंबर यात देखील ३० आकडा आवर्जून असायचा. सुरुवातीला पाच टक्के परतावा देणाऱ्या राठोडने ३० टक्के परतावा देत लक्की आकड्याचे गणित जुळवले होते. शेतकऱ्यांकडे आलेला पैसा आपल्या योजनेते गुंतवण्यासाठी त्याने गावांची निवड करतांना देखील ३० चा योग जुळवून आणला होता.

या गावातील स्थानिक राजकीय नेत्यांना हाताशी धरून राठोड आणि त्याच्या ग्रुपने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळवली होती. यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांना घसघशीत कमिशन देखील वाटण्यात आले होते. अधिकाधिक शेतकरी व लोकांनी गुंतवणूक करावी यासाठी आधीच्या गुतंवणूकदारांना व्याजाचा परतावा देण्यासाठी राठोड चक्क गोण्यांमध्ये नोटा भरून आणायचा.

महागड्या गाड्यांमधून येत राठोड आणि त्याचे सहकारी पैशाचे वाटप करायचे. त्यामुळे अनेकजण त्याच्या जाळ्यात ओढले गेले. गुंतवणूक वाढवण्यासाठी राठोड आणि त्याच्या साथीदारांनी सुरूवातीला इमानदारी दाखवत नियमित व्याजाचे वाटप केले.

पण उदिष्ठ साध्य झाल्यानंतर मात्र त्यांनी आपले रंग दाखवायला सुरूवात केली. गुंतवणूकदारांना व्याजाचा परतावा मिळणे बंद झाले, एक-दोन नाही तर तब्बल ८ महिने लोक आधी, व्याज आणि त्यानंतर मुद्दल रक्कम परत करा म्हणून राठोड आणि त्याच्यासोबतच्या लोकांमागे फिरत होते. नंतर राठोडही फरार झाला आणि त्याचे साधीदारही. पैसे बुडाले, फसवणूक झाली हे समजल्यावर बिडकीन पोलिसांत पहिला गुन्हा ३० लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी दाखल झाला आणि तीस-तीसचा भांडाफोड झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com