Gram panchayt Election : संतोष दानवेंच्या मतदारसंघात ७ सरपंच, १४६ सदस्य बिनविरोध..

Santosh Danve : भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघात मात्र ७ सरपंच आणि १४६ सदस्य हे बिनविरोध झाले आहेत.
Gram Panchayat Election, News
Gram Panchayat Election, NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna Political : केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा गावांत ३० वर्षानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. Bjp कारण यापुर्वी या ग्रामपंचयती व सरपंच हे बिनविरोध निवडले जायचे. रावसाहेब दानवे हे सरंपच, पंचायत समिती सभापती, आमदार, खासदार आणि केंद्रात मंत्री झाले. त्यामुळे त्यांचा शब्द गावात प्रमाण मानला जायचा. यावेळी मात्र त्यांची मध्यस्थी अयशस्वी ठरल्यामुळे इथे निवडणूक होत आहे.

Gram Panchayat Election, News
Bjp Mla : वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून आमदाराला समर्थकाकडून चाळीस रुपयाचे चाॅकलेट.

तर दुसरीकडे त्यांचे आमदार पुत्र संतोष दानवे यांच्या भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघात मात्र ७ सरपंच आणि १४६ सदस्य हे बिनविरोध झाले आहेत. (Jalna) त्यामुळे मोठ्या दानवेंना जमले नाही ते छोट्या दानवेंनी (Santosh Danve) करून दाखवले अशी चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. जास्तीत जास्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध व्हावेत यासाठी दानवे यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक सरपंच आणि सदस्य हे भोकरदन-जाफ्राबाद या तालुक्यातून बिनविरोध झाले आहेत.

जिल्ह्यात २६६ ग्रामपंचायतीच्या निडणुकांचा प्रचार सध्या शेवटच्या टप्प्यात आला आहे. प्रत्येक उमेदवार आणि पॅनलप्रमुख गावाचा कारभार हाती घेण्यासाठी तयारीला लागला आहे. याच दरम्यान १६ ग्रामपंचातीच्या सरपंच पदासाठी एक नामनिर्देशन शिल्लक राहिल्याने निवडणूक आयोगाच्या घोषणेची औपचारिकता राहिली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील ३३३ सदस्यही बिनविरोध झाले असून इतर जागांसाठी रविवारी (ता.१८) मतदान होणार आहे. आता जिल्ह्यातील २६६ पैकी २५३ ग्रामपंचातींसाठी मतदान होणार आहे. यात एक हजार ८२६ सदस्य व २५० सरपंच पदासाठी निवडणुक होत आहे.

तालुका एकूण ग्रामपंचायती बिनविरोध सरपंच बिनविरोध सदस्य

जालना २९ ०० ३९

भोकरदन ३२ ०४ ४५

जाफराबाद ५५ ०३ १०१

परतूर ४१ ०३ ३१

मंठा ३५ ०४ ७१

अंबड ४० ०१ २७

घनसावंगी ३४ ०१ १९

एकूण २६६ १६ ३३३

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com