Bjp Mla : वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून आमदाराला समर्थकाकडून चाळीस रुपयाचे चाॅकलेट.

Santosh Danve : तुझेच गिफ्ट सगळ्यात जास्त आवडले म्हणत त्यांनी ते चाॅकलेट स्वीकारले.
Bjp Mla Santosh Danve News, Jalna
Bjp Mla Santosh Danve News, JalnaSarkarnama
Published on
Updated on

Santosh Danve : आपल्या नेत्याचा वाढदिवस म्हटलं की त्यांचे समर्थक, चाहते भलतेच फाॅर्मात असतात. नेत्यासाठी काय करू अन् काय नको, असे त्यांना होते. Bjp अनेक चाहते हे आपल्याला झेपणार नाही एवढे महागडे गिफ्ट आणून नेत्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. पण भोकरदन-जाफ्राबादचे भाजप आमदार संतोष दानवे यांना त्यांच्या वाढदिवासनिमित्त एका चाहत्याचे चक्क ४० रुपयांचे चाॅकेलट गिफ्ट म्हणून दिले.

Bjp Mla Santosh Danve News, Jalna
Gram panchayat election : सरपंचपदासाठी सासू-सूनेत टक्कर ; तर चुलत जावेची तिसरी आघाडी..

शेकडो लोकांच्या गर्दीत कुणी महागडे बुके, तर कुणी भेट वस्तू देत असतांना या चाहत्याने मात्र गर्दीतून वाट काढत आमदारांच्या हातात चाॅकलेट देत शुभेच्छा दिल्या. (Jalna) चाॅकलेटचे गिफ्ट पाहून क्षणभर आमदार महोदय देखील आश्चर्यचकित झाले, पण तुझेच गिफ्ट मला सर्वात जास्त आवडले म्हणत त्यांनी समर्थकाचा मान राखला. (Marathwada) सध्या या चाॅकलेट भेटची चर्चा चांगलीच रंगली आहे.

संतोष दानवे यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील समर्थकांची त्यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी गर्दी जमली होती. अशातच भोकरदन शहरातील एक दानवे समर्थक तरूण निरंजन लिपणे हा संतोष दानवे यांना भेटण्यासाठी आला होता. गर्दीमुळे भेट होत नसल्याने त्याने काही तासानंतर थेट स्टेज गाठले.

भगव्या रंगाची शाल देवून त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हस्तांदोलन करून झाल्यानंतर त्यांना सोबत खिशात आणलेले चाॅकलेट दानवेंना दिले. ते पाहून स्वतः दानवे आणि तिथे उपस्थितीत सगळेच अ्वाक झाले. आमदारांना चाॅकलेट दिल्याचे पाहून अनेकांना तिथे हसू आवरले नाही. पण तुझेच गिफ्ट सगळ्यात जास्त आवडले म्हणत त्यांनी ते चाॅकलेट स्वीकारले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com