अन्नदाता संकटाने मोडून पडलाय, त्याला तुमच्या आधाराची गरज; मुंडेंची राज्य सरकारला साद

Dhananjay Munde | कापसाच्या एका एका झुडपाकडे वळून बघणाऱ्या बळीराजाला पाहून नक्कीच तुमच्याही पोटात गोळा येईल,
अन्नदाता संकटाने मोडून पडलाय, त्याला तुमच्या आधाराची गरज; मुंडेंची राज्य सरकारला साद
Published on
Updated on

परळी : मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी सोयाबीन कापूस यांसह तूर मूग उडीद अधिक खरीप पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. मराठवाड्यातील पावसाने निर्माण केलेल्या या विदारक दृश्याची पाहणी करायला या, असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

सोयाबीनचे खळे सुरू असताना आलेल्या तुफान पावसामुळे एक शेतकरी कुटुंब पाण्यात भिजत सोयाबीन गोळा करत टोपलीत भरतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. धनंजय मुंडे यांनीही हाच व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवरून शेअर केला आहे. पाण्यात वाहणारी सोयाबीन गोळा करताना व काळ्या पडलेल्या कापसाच्या एका एका झुडपाकडे पुन्हा पुन्हा वळून बघणाऱ्या बळीराजाला पाहून नक्कीच तुमच्याही पोटात गोळा येईल, असेही अशी साद त्यांनी शिंदे-फडणवीसांना घातली आहे.

अन्नदाता संकटाने मोडून पडलाय, त्याला तुमच्या आधाराची गरज; मुंडेंची राज्य सरकारला साद
Andheri By-Election : मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद करा; शिवसेनेने घेतले 'हे' आक्षेप

बळीराजा म्हणवल्या जाणाऱ्या अन्नदात्याच्या पाठीचा कणा नैसर्गिक संकटाने मोडून पडला आहे. या शेतकऱ्यांना सरकारने आधार व मदत देण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, कालही त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यातून बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानी कडेही ऱाज्य सरकारचे लक्ष वेधले होते. राज्य सरकारने जून ते ऑगस्ट दरम्यान पावसामुळे नुकसान झाले परंतु अतिवृष्टीच्या निकषात बसत नाही अशा शेती पिकांच्या नुकसानीच्या मदतीपोटी राज्यातील नऊ जिल्ह्यांना 755 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पण त्यातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 17 लाख रुपयांची मदत घोषित केल्याने धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला होता.

राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित क्षेत्राला मदत करतानाही बीड जिल्ह्यात पडलेला पाऊस त्या निकषात बसत नसल्याचे सांगून जिल्ह्याला मदतीतुन वगळले होते. त्याचीही आठवण करून देत धनंजय मुंडे यांनी आता एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना मराठवाड्यातील व बीड जिल्ह्यातील नुकसान बघण्यासाठी प्रत्यक्ष येण्याचे आवाहन केले आहे, याची दखल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेणार का? खरंच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रति आत्मीयता दाखवून ओला दुष्काळ किंवा तत्सम विशेष मदतीची राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा करणार का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com