मुंबई : अंधेरी (Andheri) पूर्व पोटनिवडणुकीत (By-Election) शह-कटशहाच्या राजकारणाला जोर चढला आहे. शिवसेनेकडून (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार मुरजी पटेल यांच्या निवडणूक अर्जावर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. निवडणूक शपथपत्रात त्यांनी अनेक गुन्ह्यांची माहिती लपवल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. (Cancel the candidature of BJP candidate Murji Patel : Shiv Sena's demand)
शिवसेनेकडून मुरजी पटेल यांच्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपाचे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. त्यात मुरजी पटेल यांचा निवडणूक अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर या पत्रातून चार ते पाच आक्षेप घेण्यात आलेले आहेत.
पटेल यांच्यावर २०१७ पासून सहा वर्षांची निवडणूक लढण्यास बंदी असताना, त्यांनी उमेदवारी अर्ज कसा काय दाखल केला?, उच्च न्यायालयाने निवडणूक लढण्याच्या परवानगीबाबतची याचिका फेटाळली असतानाही पटेल यांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला आहे?, निवडणूक प्रतिज्ञापत्रात या दोन्ही घटनांची माहिती देणे बंधनकारक असताना ती पटेल यांच्याकडून लपविण्यात आली आहे. पटेल यांच्यावर निवडणूक लढविण्यासंदर्भात बंदी असल्याने त्यांचा मतदानाचा अधिकारही काढून घेण्यात यावा. तसेच, पटेल यांनी त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याची माहितीही लपवली आहे, असे आक्षेप शिवसेनेकडून घेण्यात आले आहेत.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात अनेक गोष्टी मुरजी पटेल यांनी लपवल्या आहेत, त्यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे, त्यामुळे पटेल यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, असेही आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, पटेल यांच्यावरील सर्व आक्षेप निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आले आहेत. पण ते कशाच्या आधारावर फेटाळण्यात आले. ते का फेटाळले आणि कोणाच्या दबावाखाली आयोगाने हे काम केले आहे, हे माहिती नाही. पण पटेल यांच्यासारखा भ्रष्टाचारात बुडालेल्या माणसाला भाजपने उमेदवारी दिली कशी, असा सवालही नाईक यांनी केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.